स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा पदग्रहण सोहळा संपन्न.
अमळनेर :- तालुक्यातील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल, अमळनेर येथे 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठीचा विद्यार्थ्यांचा पदग्रहण सोहळा अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अमळनेर विभागाचे डीवायएसपी श्री. विनायक कोते व पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय निकम यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी हेडबॉय म्हणून ऋषिकेश पाटील, हेडगर्ल म्हणून चैतन्य वारके तर प्रेफेक्ट हेड म्हणून यश सुतार व परी चंदन यांची निवड करण्यात आली.
डीवायएसपी खोटे साहेब व पोलीस निरीक्षक निकम साहेबांनी आकाश, पृथ्वी, अग्नी आणि सूर्य या हाऊसेसचे फ्लॅग प्रदान करत विद्यार्थ्यांवर जबाबदाऱ्या सोपवल्या. विद्यार्थ्यांनी आकर्षक पथसंचलन करत प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली.
कार्यक्रमाला शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नीरज अग्रवाल, अध्यक्षा सीतीका अग्रवाल, चेअरमन श्री. डी. डी. पाटील, जास्मिन भरूचा, तालुका क्रीडा समन्वयक सुनील वाघ, व्यवस्थापन सदस्य ममता अग्रवाल व आचल अग्रवाल उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम शाळेचे प्राचार्य श्री. विनोद अमृतकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. मान्यवरांनी नव-नियुक्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी क्रीडा शिक्षक योगेश पाटील, जय जाधव, विनय निरंकारी यांनी परिश्रम घेतले.