रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- तालुक्यात गलवाडे रोड परिसरात अनधिकृत गौण खनिज रेती वाहतूक करणाऱ्या डंपरवर महसूल विभागाने धडक कारवाई करत डंपर जप्त केला आहे. ही कारवाई उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे साहेब तसेच तहसीलदार रुपेश कुमार सुराणा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सदर डंपर तहसील कार्यालय, अमळनेर येथे जमा करण्यात आला असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई बेकायदेशीर खनिज वाहतुकीला आळा घालण्यासाठी करण्यात आली आहे.
या पथकात उपस्थित कारवाई करण्यात आली.
जितेंद्र पाटील,संदीप माळी ,विकेश भोई अमोल चक्रे,आकाश गिरी ,सुधीर पाटील ,पवन शिंगारे ,अभिमान जाधव .प्रशासनाने घेतलेल्या या तात्काळ आणि प्रभावी कारवाईमुळे स्थानिकांतून समाधान व्यक्त होत असून, अशा बेकायदेशीर कृत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांचे पाऊल कौतुकास्पद ठरत आहे.