रिपोर्टर नूरखान
अमळनेर :-आज मुंबई येथे अमळनेर तालुक्यातील ताडेपुरा – भिमनगर परिसरातील प्रसिद्ध समाजसेवक किरण बहरे यांनी आज मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (शिंदे गट) मध्ये अधिकृत प्रवेश केला.
किरण बहारे हे अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असून, परिसरात ते एक प्रेमळ स्वभावाचे, मनमिळावू आणि लोकांच्या प्रश्नांवर तातडीने कृती करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. त्यांचे समाजातील विविध घटकांशी जिव्हाळ्याचे संबंध असून, जनतेत त्यांचा चांगला जनाधार आहे.
राजकारणात सक्रियपणे भाग घेण्याचा निर्णय घेत प्रभाग क्रमांक ३ (सामान्य पुरुष) येथून महानगरपालिका निवडणुकीसाठी त्यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. या प्रभागात ताडेपुरा व भिमनगर या भागांचा समावेश आहे.
शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केल्यानंतर पक्षाकडून त्यांना संधी मिळण्याची शक्यता असून, त्यांच्या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात नवचैतन्य निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
पक्षप्रवेश प्रसंगी शिवसेनेतील विविध नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.