Saturday, October 18, 2025
Saturday, October 18, 2025
Saturday, October 18, 2025
spot_img
spot_img
A venture of Pen First Media and Entertainment Pvt. Ltd
Member of Working Journalist Media Council Registered by - Ministry of Information and and Broadcasting, Govt. Of India. New Delhi
HomeMarathiशारदीय व्याख्यानमाला अमळनेरात 22 सप्टेंबरपासून संगीत, कविता, समाजसेवा, पालकत्व आणि कला या...

शारदीय व्याख्यानमाला अमळनेरात 22 सप्टेंबरपासून संगीत, कविता, समाजसेवा, पालकत्व आणि कला या विषयांवर मान्यवरांचा व्याख्यानसंच.

रिपोर्टर नूरखान

अमळनेर :- मराठी वाङ्‌मय मंडळ, अमळनेर व प्रा. आप्पासाहेब र. का. केले सार्वजनिक ग्रंथालय व मोफत वाचनालय, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 22 ते 26 सप्टेंबर 2025 दरम्यान शारदीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्यानमालेचे उद्घाटन मा. अनिल भाईदास पाटील (आमदार) यांच्या हस्ते होणार असून, मा. स्मिता उदय वाघ (खासदार, जळगाव) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

या व्याख्यानमालेत कला, साहित्य, समाजसेवा, काव्य, संगीत, पालकत्व यांसारख्या विविध विषयांवर नामवंत व्यक्तींची प्रेरणादायी व्याख्याने रसिकांना अनुभवायला मिळणार आहेत.

कार्यक्रमाचा तपशील.

२२ सप्टेंबर – प्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार, मुंबई
विषय : एका संगीतकाराची मुसाफिरी (किस्से, गाणी आणि अनुभव)

२३ सप्टेंबर – सुप्रसिद्ध मराठी कवी अशोक बागवे व अरुण म्हात्रे, ठाणे
विषय : काव्यसंध्या – सुमधुर मराठी कवितांचा सुंदर कार्यक्रम

२४ सप्टेंबर – समाजसेविका व गझलकार ममता सिंधुताई सपकाळ, पुणे
विषय : हा खरा जीवन प्रवास

२५ सप्टेंबर – इंजि. सुधीर वाघुळदे व डॉ. राहुल भोईटे, जळगाव
विषय : आनंदी पालकत्व – सकारात्मक दृष्टिकोन

२६ सप्टेंबर – सिनेअभिनेता, लेखक व दिग्दर्शक योगेश सोमण, मुंबई
विषय : कला क्षेत्राचा समाज मनावर होणारा प्रभाव

ठिकाण व वेळ.

मराठा मंगल कार्यालय, अमळनेर | दररोज सायंकाळी ६.३० वा.

आयोजकांचे आवाहन .

या व्याख्यानमालेचा आनंद घेण्यासाठी अमळनेर व परिसरातील रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मराठी वाङ्‌मय मंडळ, अमळनेरचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे, कार्यवाह नरेंद्र निकुंभ, कोषाध्यक्ष प्रदीप साळवी आणि मंडळाच्या कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular