Tuesday, September 9, 2025
Tuesday, September 9, 2025
Tuesday, September 9, 2025
spot_img
spot_img
A venture of Pen First Media and Entertainment Pvt. Ltd
Member of Working Journalist Media Council Registered by - Ministry of Information and and Broadcasting, Govt. Of India. New Delhi
HomeMarathiअमळनेरमध्ये तणावपूर्ण शांतता; ईद-मिलाद मिरवणुकीदरम्यान दगडफेकीची घटना.

अमळनेरमध्ये तणावपूर्ण शांतता; ईद-मिलाद मिरवणुकीदरम्यान दगडफेकीची घटना.

रिपोर्टर नूरखान

गांधलीपुरा परिसरात दगडफेकीने खळबळ; एकजण जखमी, पोलीस तपास सुरू.

अमळनेर :- शहरात काल गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत व उत्साहात पार पडल्यानंतर आज ईद-मिलाद निमित्त मुस्लिम समाजाच्या मिरवणुकीदरम्यान गांधलीपुरा पोलिस चौकीजवळ अचानक दगडफेकीची घटना घडल्याने शहरात काही काळ तणाव निर्माण झाला.

मिरवणुकीदरम्यान अचानक दगडफेक झाल्याने एक इसम गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्याला जबर मार बसला आहे. जखमी इसमास तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. याप्रसंगी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांनी त्वरित परिस्थिती नियंत्रणात आणली.

शहरात गणेश विसर्जन व ईद-मिलाद मिरवणुकीसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शहरात पोलीस फोर्स, होमगार्ड, व तालुकास्तरीय अधिकारी तैनात करण्यात आले होते. मिरवणुकीदरम्यान डॉ. रेड्डी यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, एलसीबीचे निरीक्षक व इतर अधिकारी उपस्थित होते.

घटनेनंतर पोलीस अधीक्षकांनी स्वतः घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला असून, नेमकी दगडफेक कोणी केली याचा शोध घेण्यात येत आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या आधारावर तपास सुरू आहे.

पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.की, कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये.तसेच समाजात तेढ निर्माण होईल अशा कोणत्याही प्रकारचे फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करू नये. असे प्रकार आढळल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular