अमळनेर :- येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित द्रौ.रा.कन्या शाळेचा 81 वा वर्धापन दिन म्हणजेच सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सुरुवातीला ईशस्तवन व स्वागत गीत झाले.त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अलिबाग व शाळेच्या माजी विद्यार्थीनी डॉ. पूर्वा रंगराव पाटील, चीफ मॅजेस्टर यवतमाळ व माजी विद्यार्थीनी अर्चना मोहन शहा व शाळेचे आश्रय दाते भांडारकर परिवारातील विवेकानंद भांडारकर,विनोद भांडारकर, हेमंत भांडारकर व सर्व संचालकांनी दीप प्रज्वलन व हवेत फुगे उडवून कार्यक्रमाचे उदघाट्न केले. अहवालवाचन शाळेच्या मुख्याध्यापिका एस एस सूर्यवंशी यांनी केले.
त्यानंतर झालेल्या सत्कार समारंभात शाळेत आलेल्या सर्व माजी विद्यार्थिनींचा व शाळेतील गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. शाळेतील पुरस्कार प्राप्त सर्व शिक्षकांचे सत्कार करण्यात आले.त्यानंतर शाळेचे हस्त लिखित फुलवात याचे प्रकाशन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थीदशेत असताना काय व कसे शिक्षण घेतले पाहिजे. स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.तसेच शालेय जीवनात आभासी जगापासून दूर राहावे व आपले हितजोप असावे असे सांगितले. अध्यक्षा डॉ.पूर्वा पाटील यांनी सोशल मीडिया वापरण्यापेक्षा सोशल व्हावे. आरोग्य उत्तम राखावे. आताच्या जेंझी पिढीने इंटरनेटचा वापर विविध वैज्ञानिक माहितीसाठीच करावा.आपले एसएससीचे गुण दिशा दर्शक असल्याने अभ्यास वाढवावा. इंटरनेट व सोशल मीडिया पेक्षा आपल्या शिक्षकांकडून माहिती घ्यावी.मुलींनी आपल्या शरीराची निगा राखावी तसेच निळ्या पऱ्यांनी रंगीबेरंगी स्वप्न घेऊन उडावे अशा शुभेच्छा दिल्या व आपल्या शाळेसाठी दीड लाखाचा धनादेश मुख्याध्यापिका व संचालक मंडळाकडे सुपूर्द केला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन शाळेच्या विद्यार्थिनींनी केले.रोटरी क्लब तर्फे प्रतीक जैन व कोठारी यांनी शाळेच्या विद्यार्थीनींना शैक्षणिक अँप भेट म्हणून दिले.शाळेच्या एस एस सी च्या 1883 बॅच च्या माजी विद्यार्थिनींनी त्यात शाळेच्या आताच्या मुख्याध्यापिका एस.एस.सूर्यवंशी,सुषमा जोशी, कल्पना सोनवणे, आशा बिडकर, मनीषा वैद्य, नीलिमा उज्जैनकर व इतर मैत्रिणींच्या ग्रुपने शाळेसाठी 55 इंची आड्रॉइड एलसीडी तसेच रॅलीसाठीचा साउंड सर्व्हिस सिस्टीम भेट दिला.
तसेच शिरसोली येथे कार्यरत उपशिक्षिका व 1987 च्या माजी विद्यार्थी सुरेखा वैष्णव यांनी 55 पुस्तक संच भेट दिले.कार्यक्रमाच्या अध्यक्षा व अलिबाग येथिल शासकीय वैद्यकीयाच्या महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. पूर्वा रंगराव पाटील, यवतमाळ येथिल चीफ मॅजेस्टर व माजी विद्यार्थीनी अर्चना मोहन शाहा, शाळेचे आश्रयदाते विवेकानंद भांडारकर,विनोद भांडारकर, हेमंत भांडारकर, अध्यक्ष जितेंद्र झाबक, उपाध्यक्ष जितेंद्र देशमुख, माधुरी पाटील, विश्वस्त वसुंधरा लांडगे,कार्याध्यक्ष डॉ. संदेश गुजराथी, संचालक डॉ.अनिल शिंदे, प्रदीप अग्रवाल,योगेश मुंदडे,
जेष्ठ संचालक हरिअण्णा वाणी, कल्याण पाटील विनोदभैया पाटील,
शाळेचे चेअरमन नीरज अग्रवा, प्राचार्य डॉ. ए. बी. जैन, संस्थेचे चिटणीस प्रा. पराग पाटील, जी. एस.हायस्कुल मुख्याध्यापक व्ही.एम.पाटील, शिक्षक प्रतिनिधी डी.एन.पालवे,
प्रताप हायस्कुल मुख्याध्यापक एस. बी. निकम, माजी मुख्याध्यापिका उज्वला शहा, माधुरी खांजोडकर,माजी शिक्षिका पी. पी. खैरनार,बी.यु. भंडारकर,लिपिक शाम पवार,
शिक्षकेतर प्रतिनिधी मनोहर दीक्षित,शाळेच्या काही माजी विद्यार्थिनी,शाळेचे सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते. शेवटी विद्यार्थिनींना जेवण देण्यात आले.
द्रौ. रा. कन्या शाळेचा सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यासाठी
शाळेचे कलाशिक्षक डि एन पालवे यांनी बनविलेला लोगो व द्रौपदीबाई रामचंद्रशेठ भंडारकर यांचे रेखाटलेले चित्र आकर्षण ठरले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता विद्यार्थीनी भाविका वाल्हे, पाहुण्यांचा परिचय गार्गी जोशी, फुलवात या हस्तालिखिताचे प्रकाशन सूत्रसंचालन श्रावणी मोरे व आभार रिचल पाटील यांनी केले. या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याचे आकर्षण ठरले.