Nasik – Staff Reporter
शिक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांमध्ये पटवून देऊन सामान्य विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा दर्जा वाढवला पाहिजे हेच विद्यार्थी भविष्यामध्ये देशाचं भविष्य उज्वल करतील व भारत देशाला महासत्ता बनवण्याकरता भारताचे विद्यार्थी अग्रेसर राहतील असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रभारी ब्रिज किशोर दत्त यांनी केले. अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांचा सध्या शिक्षणाकडे जोर असून अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी प्रगती केली आहे. सर्व समाजातील विद्यार्थी देश घडवण्याकरता अग्रेसर राहतील असेही मत श्री ब्रिज किशोर दत्त यांनी व्यक्त केले. नाशिक जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या वतीने गुणगौरव विद्यार्थी सत्कार समारंभामध्ये अध्यक्षस्थानी असलेले ब्रिज किशोर दत्त यांनी आपले मत व्यक्त केले. जिल्हा अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष तनवीर खान यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी नाशिक जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांनी देश पातळीवर आपले नाव उज्वल केले आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये नाशिक जिल्हा कायम अग्रेसर असतो त्यामुळे अशा कार्यक्रमाने विद्यार्थ्यांना उत्साह मिळतो, प्रेरणा मिळते असे कार्यक्रम वारंवार काँग्रेस पक्षाकडून भविष्यात केली जातील असे मत श्री कोतवाल यांनी व्यक्त केले. नाशिक जिल्हा अल्पसंख्याक विभाग कायमच कौतुकास्पद कार्यक्रमांचे आयोजन करते. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा सत्कार केल्यामुळे विद्यार्थ्यांना एक नवीन प्रेरणा मिळाली आहे. भविष्यात अल्पसंख्याक विभागाच्या वतीने विविध स्पर्धा परीक्षण करता मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात येतील असे मत नाशिक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश छाजेड यांनी या कार्यक्रमात व्यक्त केले. नाशिक नाशिक जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष तनवीर खान यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. अशा कार्यक्रमांचा आयोजन दरवर्षी करून गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाकरता कायम मदत केली जाईल असे आपल्या प्रास्ताविकामध्ये श्री तनवीर खान यांनी प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे आयोजक तनवीर खान यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आसिफ शेख व यशवंत क्लासचे संचालक भालचंद्र पाटील यांचे याप्रसंगी मार्गदर्शन पर भाषण झाले, याप्रसंगी नाशिक शहर व जिल्ह्यातील 100 विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. तसेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लिटमस अकॅडमी, लोकहित शैक्षणिक प्रसारक संस्था व इतर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला.जिल्हा अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रदेश काँग्रेसचे महासचिव ब्रिज किशोर दत्त, नाशिक जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शिरीष कोतवाल, नाशिक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश छाजेड, जेष्ठ नगरसेविका वत्सलाताई खैरे, नाशिक शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्निल पाटील, नाशिक शहर महिला काँग्रेस अध्यक्ष स्वाती जाधव, नाशिक शहर काँग्रेस अनुसूचित जमाती विभागाचे अध्यक्ष संतोष ठाकूर, शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष भालचंद्र पाटील, नदीम मणियार, सलीम शेख, सलीम तांबोळी, राजकुमार जेफ, तहसीन मणियार, तनवीर खान, हसन मुजावर, फारूक मंसूरी, दर्शन पाटील, उषाताई साळवे, नंदकिशोर सूर्यवंशी, सॅम्युअल अवताडे, जुलीताई डिसूजा, शब्बीर खाटीक, गुड्डी खान, जफर पठाण, संतोष हिवाळे, हमीद खान, राहुल सूर्यवंशी, जावेद पठाण, शकील भाई, मोहन खरे, प्रथमेश वर्धे, मुस्ताक शेख, अनिल बेग, मुस्ताक सय्यद, हाजी बाबू भाई , आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.