Nasik – Altaf Khan
मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष माननीय नामदार प्यारे खान साहेब यांची भेट घेण्यात आली नाशिक शहरातील महानगरपालिका संचलित उर्दू शाळांच्या सध्याच्या परिस्थिती व खालावत चाललेला शैक्षणिक दर्जा रोडावत चाललेले विद्यार्थ्यांची संख्या बंद होत चाललेल्या शाळा याबाबत सविस्तरपणे चर्चा करण्यात आली यामधून त्यांनी समक्ष भेट देण्याचे आश्वासन दिलेले आहे येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून उर्दू माध्यमांच्या काही शाळा ह्या डिजिटल करून सेमी इंग्लिश माध्यमाच्या करण्याचे त्यांनी आश्वासन दिले त्याच प्रकारे अनेक दिवसापासून रखडलेला आहे. मुस्लिम समाजाच्या नानावली व वडाळा येथील दफनभूमीच्या जागेबाबत कागदपत्र सहित महानगरपालिका व जिल्हा अधिकारी कार्यालय यांची चाल ढकल भूमिका त्यांच्यासमोर मांडण्यात आली त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना ताबडतोबिने आदेशित करून अहवाल सादर करण्याचे सांगितले आहे सदर शिष्टमंडळामध्ये मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष अजिज पठाण रफिक साबीर व अकील खान उपस्थित होते.