Friday, March 13, 2026
Friday, March 13, 2026
Friday, March 13, 2026
spot_img
spot_img
A venture of Pen First Media and Entertainment Pvt. Ltd
Member of Working Journalist Media Council Registered by - Ministry of Information and and Broadcasting, Govt. Of India. New Delhi
HomeMarathiअमळनेरात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली,माजी मंत्री आ.अनिल पाटलांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम नेत्यांचा मोठा...

अमळनेरात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली,माजी मंत्री आ.अनिल पाटलांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम नेत्यांचा मोठा प्रवेश.​असंख्य मुस्लिम नेत्यांनी टाकला राष्ट्रवादीत विश्वास.

रिपोर्टर नूरखान

​अमळनेर :- माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली अमळनेर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेशाचा ओघ कायम असून, नुकताच असंख्य मुस्लिम समाजाच्या ज्येष्ठ नेत्यांनी पक्षात उत्साहाने प्रवेश केला आहे. या महत्त्वपूर्ण प्रवेशांमुळे अमळनेर शहरात राष्ट्रवादीची ताकद लक्षणीयरीत्या वाढल्याचे दिसत आहे. आमदार अनिल पाटील यांनी या सर्व नेत्यांचे पक्षाचा फटका शाल घालून स्वागत केले.
​मागील आठवड्यात हिंदू आणि मुस्लिम समाजातील काही माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला होता. यानंतर लगेचच, आता काँग्रेसच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांसह ज्येष्ठ मुस्लिम नेत्यांनी आणि माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादीत अधिकृत प्रवेश घेतला आहे.

​या प्रमुख नेत्यांचा झाला प्रवेश.
प्रवेश करणाऱ्यांमध्ये काँग्रेसचे नेते आमीरखा मिस्तरी, हाजी दबिरखा पठाण, माजी नगरसेवक रहेमान मेंबर, निवृत्त नायब तहसीलदार साबीर खान पठाण, तौसिफ हाजी शेखा, जफर मण्यार, साबीर पठाण, कादीर खा पठाण, फरदीन खा आदींसह अनेक मान्यवरांचा समावेश आहे. या सर्वांनी आमदार अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.
​यावेळी राष्ट्रवादी शहराध्यक्ष मुख्तार खाटीक, जिल्हा उपाध्यक्ष इम्रान खाटीक, आरीफ पठाण, सैय्यद आबीद अली, कलीम शेख, इम्रान शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

​यावेळी बोलताना आमदार अनिल पाटील यांनी प्रवेश करणाऱ्यांच्या या निर्णयाचे कौतुक केले. “शहराच्या विकासासाठी आणि समाज बांधवांच्या हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमी कटीबद्ध राहील. आपल्या सर्वांच्या सहकार्याने शहरात नवी विकासकामे आणू,” अशी ग्वाही त्यांनी दिली. या मोठ्या प्रवेशामुळे आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थिती अधिक मजबूत होईल, असे बोलले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page

error: Content is protected !!