सुरगाणा प्रतिनिधी
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित नूतन विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय सुरगाणा येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.प्रभाकर चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी पर्यवेक्षक खैरनार सर, भोये सर सुरगाणा वन खात्यातील वनसंरक्षक पवार सर, गवळी मॅडम उपस्थित होते.
प्रथमतः विद्यालयाचे मुख्याध्यापक व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.प्रभाकर चव्हाण यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणातून मुख्याध्यापक श्री.प्रभाकर चव्हाण यांनी राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करण्यासाठी प्रेरणा दिली व मार्गदर्शन केले.तसेच मा जिजाऊ यांनी बालपणापासून छत्रपती शिवाजी महाराज यांना महाभारत, रामायण व वीर कथा सांगत घडविले.आजच्या तरूणांसाठी स्वामी विवेकानंदांचे विचार फार महत्त्वाचे आहेत.त्यांनी सेवा,त्याग व समर्पण या मूल्यांचा पुरस्कार केला.तरुणांनी आपल्या देशाच्या आणि समाजाच्या विकासासाठी योगदान द्यावे असे त्यांचे मत होते असे नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.शेवाळे सर यांनी तर आभारप्रदर्शन मन्सूरी सर यांनी केले.याप्रसंगी चौधरी सर ,अहिरे सर, थवील सर, पाटील सर सर्व शिक्षक बंधु-भगिनी शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.