हिंगोणे येथे पीक संरक्षणासाठी फवारणीचे प्रात्यक्षिक
हिंगोणा ता यावल (प्रतिनिधी ) शब्बीरखान
ग्रामीण कृषि जागरूकता अणि कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शासकीय कृषि महाविद्यालय, मुक्ताईनगर येथील
शिरीष कांबळे, प्रज्वल पाटील, तेजस वेताळ, ओम स्वामी, प्रथमेश शेळके व आदित्य पवार ह्या कृषिदूतांनी,
हिंगोने या गावात वनस्पती संरक्षण या विषयाचे प्रात्यक्षिकेचे आयोजण करण्यात आले होते, या मध्ये
शेतात फवारणी कशी करावी, रसायन कालवतांना त्याचा क्रम कसा असावा (पाहिलं बुरशीनाशक मग कितनाशक मग खते किंव्हा टॉनिक्स आणि त्यानंतरून पानावर रसायन चितकून रहावं म्हणून स्टिकर्स) फवारणी करतांना कुठले वस्त्र परिधान केले पाहिजेत, फवारणीसाठी द्रावण कसं तयार करावं व फवारणी कधी करावी आणि त्याची दिशा कोणती असावी अशा महत्वाच्या प्रश्नांच निदान शेतकऱ्यांच्या शेतात केले.
या कार्यक्रमासाठी कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. संदीप पाटील, ग्रामीण कृषि जागरूकता व कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाचे चेअरमन डॉ. दत्तात्रय पाचारणे, कार्यक्रम समन्वयक डॉ. बाळासाहेब रोमाडे, कार्यक्रम अधिकारी डॉ. सागर बंड व विविध विषयातील विषय विशेषज्ञ यांचे मार्गदर्शन लाभले होते.