रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- शहरातील कसाली मोहल्ल्यातील रहिवासी तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले हाजी सईद शेख अय्युब यांची ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाच्या अमळनेर शहराध्यक्ष पदावर तिसऱ्यांदा फेरनियुक्ती करण्यात आली आहे.
पक्ष संघटन बळकट करण्यासाठी त्यांनी दिलेल्या सक्रिय योगदानाची दखल घेत एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील, प्रदेश सरचिटणीस समीर साजिद बिल्डर, तसेच जळगाव जिल्हा निरीक्षक शारिक नक्षबंदी यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.
जळगाव जिल्हा समन्वयक आसिफ पटेल यांनी हाजी सईद शेख यांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांची फेरनियुक्ती अधिकृतरीत्या जाहीर केली. या प्रक्रियेत AIMIM चे स्थानिक नेते नईम सर यांनी विशेष परिश्रम घेतले.
हाजी सईद शेख यांच्या फेरनियुक्तीबद्दल अल्ताफ राजा, अल्तमाश शेख, सलमान शेख, मझहर पठाण, आकिब शेख कराड, युसुफ पठाण, मोहसिन पटवे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले असून, आगामी काळात पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.