रिपोर्टर नूरखान
अमळनेर -: जळगाव येथील रहिवासी अनिल शाहू पाटील हे काही कामानिमित्त अमळनेर शहरातील ढेकू रोड परिसरात आले असतांना त्यांचा अंदाजे २०,००० किंमतीचा सॅमसंग M33 मोबाईल ढेकू रस्त्याला पडलेला होता. ही घटना घडत असताना योगायोगाने त्या परिसरातून जात असलेले पोलीस सिद्धांत सिसोदे यांना रस्त्याच्या कडेला मोबाईल पडलेला आढळला.
मोबाईल उचलून त्यांनी त्यातील माहितीच्या आधारे मालकाचा शोध सुरू केला. मोबाईल लॉक असतानाही, त्यांनी मोबाईलवरील डायलर आणि इतर माहितीचा उपयोग करून मालकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्यांनी ‘संजू टी कॉर्नर’ या ठिकाणी जाऊन अनिल पाटील यांची भेट घेतली व मोबाईल त्यांच्याकडे सुखरूप परत केला.
या प्रामाणिक कृत्यामुळे पोलीस सिद्धांत सिसोदे यांचे शहरात सर्वत्र कौतुक होत असून, त्यांच्या कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकता आणि तत्परतेचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
हरवलेली वस्तू मिळाली तरी ती परत न करणाऱ्या अनेक उदाहरणांच्या पार्श्वभूमीवर, सिद्धांत सिसोदे यांचा हा आदर्श कृती समाजात सकारात्मक संदेश देणारी आहे. अशा पोलीस कर्मचाऱ्यांमुळेच नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक बळकट होतो.