Wednesday, February 5, 2025
Wednesday, February 5, 2025
Wednesday, February 5, 2025
spot_img
spot_img
A venture of Pen First Media and Entertainment Pvt. Ltd
Member of Working Journalist Media Council Registered by - Ministry of Information and and Broadcasting, Govt. Of India. New Delhi
HomeMarathiसुकी नदीच्या पुलावर दीड लाखांचा गुटखा पकडला

सुकी नदीच्या पुलावर दीड लाखांचा गुटखा पकडला

रावेर प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेली सुगंधीत तंबाखू व विमल गुटखा चिनावल ते उटखेडा जाणाऱ्या रस्त्यावरील सुकी नदीच्या पुलावर सावदा पोलिसांनी पडकला असून तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी १ लाख ६१ हजार १०५ रुपयाचा गुटखा जप्त केला आहे. चिनावल व उटखेडा शिवारात दुचाकीवर रोझोदा येथील

अजय शांताराम कोळी (वय ३७) व चिनावल येथील यश उर्फ योगेश पीतांबर चौधरी (वय २७) व लोहारा येथील अस्लम सलीम तडवी (वय २९) हे गुटखा वाहतूक करत असताना मिळून आले. या कारवाईत पोलिसांनी त्यांच्या ताब्यातील काळ्या रंगाची बजाज डिस्कव्हर दुचाकी (एमएच १९, बीए ७५७८) सह १ लाख ६१ हजार १०५ किमतीचा गुटखा जप्त केला. या घटनेचा तपास सावदा पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular