१० वीच्या विद्यार्थ्यास लाथाबुक्यांनी व काठीने मारणार.
मारवड येथील सूरजमल हिरालाल मुंदडे हायस्कूल येथील घटना.
अमळनेर : आई नंतर मुलांना माया देणारे शिक्षकच असतात. जगात आई आणि शिक्षक यांना एकसमान स्थान आहे. मात्र अमळनेर तालुक्यातील मारवड येथील सुरजमल हिरालाल मुंदडे हायस्कूल येथील शिक्षकच निर्दयी झाल्याची माहिती समोर आली आहे. मारवड हायस्कूल येथे 10 वी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला या निर्दयी शिक्षकाने लाथाबुक्यांनी व काठीने बेदम मारहाण केली आहे. हा विद्यार्थी मार खात जमिनीवर कोसळला तरी देखील त्या निर्दयी शिक्षकाला दया आली नाही. संजय रमेश बागुल असे या निर्दयी शिक्षकाचे नाव आहे.
या शिक्षकाने १०वीच्या विद्यार्थी शालेय पोषण आहार खाल्ला म्हणून अमानुष मारहाण केली असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र हे योग्य कारण असू शकत नाही तर हे फक्त आणि फक्त तो विद्यार्थी दलित असल्याने मारल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.
मारवड पोलीस ठाण्यात विद्यार्थी व त्याचे पालक तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता मात्र गावातील काही लोकांनी तक्रारदार यांच्यावर दबाव टाकून तक्रार करू नये असे सांगितले असल्याचे सांगण्यात येत आहे.
निर्दयी बागुल या शिक्षकाचे दर वर्षी असे प्रकरणे सुरू असल्याची चर्चा आहे. तर हा संस्थाचालकाचा नातलग असल्याने त्यावर शालेय तथा तालुका स्तरावर कारवाई होत नाही.
या शिक्षकाच्या हातून एखाद्या विद्यार्थ्याचा जीव जाऊ नये म्हणून त्याला निलंबित करावे अशी मागणी शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य व तक्रार माध्यमिक शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांच्याकडे करण्यात आली आहे.
मुलाची काहीच चूक नव्हती
आमच्या मुलाचे काही चुकले असेलही, परंतु शिक्षकांनी त्याला समजावून सांगणे अपेक्षित होते. एक वेळ शिक्षा केली तरी मान्य, परंतु अशी जीवघेणी शिक्षा देणे योग्य नव्हे, अशा घटना पुन्हा घडू नयेत.’’