रिपोर्टर नूरखान
अमळनेर – तालुक्यातील मांडळ शिवार, जवखेडा, वावडे व परिसरात पांझरा नदीतून दिवस-रात्र बेकायदेशीर वाळू उपसा व वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची माहिती उघड झाली आहे. या प्रकरणात तालाठी व वाळू माफियांचे संगनमत असल्याची खात्रीशीर माहिती स्थानिकांकडून समोर येत आहे.
वाळू उपसामुळे शेतीचे नुकसान, रस्त्यांची झालेली दुर्दशा, व पर्यावरणाचा यामुळे शेतकरी व नागरिक त्रस्त झाले आहेत. बोरी नदी परिसरातही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
या प्रकरणाकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालण्याची गरज होत आहे.