रिपोर्टर नूरखान
अमळनेर :-जळगांव येथे महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या जळगाव जिल्हा कार्यकारिणीकडून अमळनेर तालुक्याच्या नवीन कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष दादासाहेब श्री किशोर भाऊ मधुकर वाघ यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमास महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे उपाध्यक्ष श्री किशोरभाऊ सूर्यवंशी अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून महिला अध्यक्षा सौ. भारतीताई सोनवणे, सदस्य श्री सुनील भाऊ बोरसे, श्री रवींद्र दादा शिरसाठ, जिल्हाध्यक्ष (पश्चिम) दादासाहेब श्री किशोर भाऊ वाघ, जिल्हाध्यक्ष (पूर्व) श्री सचिन भाऊ सोनवणे, श्री जगदीश भाऊ वाघ, श्री पंडित दादा सणांसे, व कार्याध्यक्ष श्री चंद्रकांत दादा शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
नवीन तालुका कार्यकारिणी अमळनेर .
मधुकर तुळशीराम सैंदाणे – तालुकाध्यक्ष, दिलीप राजाराम सोनवणे – तालुका उपाध्यक्ष, सिताराम महादू बोरसे – तालुका सचिव, नंदलाल नामदेवराव जगताप – तालुका संघटक, भिकन दंगल सैंदाणे – तालुका खजिनदार, जगदीश गोविंदराव ठाकरे – तालुका संपर्कप्रमुख, सुरेश रमेश वरुडे – जिल्हा कार्यकारिणी सदस्य, गणेश दगडू सैंदाणे – जिल्हा कार्यकारिणी सदस्य, कैलास उत्तम वारुळे – जिल्हा कार्यकारी सदस्य.
या कार्यक्रमात सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या कार्याच्या विस्तारासाठी आणि समाजहितासाठी ही कार्यकारिणी महत्त्वपूर्ण कार्य करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.