रिपोर्टरनूरखान
अमळनेर : स्वातंत्र्यानंतर या देशात जातीपातीचे राजकारण सुरू झाले. सर्वप्रथम अण्णासाहेब पाटील यांनी आर्थिक निकषावर मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी केली होती. सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावर जाती जातीत अंतर वाढले आहे. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,देवेंद्र फडणवीस आणि विखे पाटील यांच्यामुळे मराठ्यांना आरक्षण मिळाले आहे असा दावा आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार नरेंद्र पाटील यांनी अमळनेर येथे मराठा मंगल कार्यालयात पुरस्कार वितरण व गुणवंतांचा सन्मान करताना केले.
अमळनेर तालुका मराठा समाजातर्फे समाजातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्याना समाजभूषण पुरस्कार , गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि नव्या भोजन कक्षाचे भूमिपूजन ५ रोजी मराठा मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अनिल पाटील होते.
आमदार अनिल पाटील म्हणाले की समाजाच्या संचालक मंडळाकडून चांगली कामे होत आहेत. समाजातील गुणवंत व्यक्तींची प्रेरणा आणि ताकद वाढवण्यासाठी एक दिवस आपण समाजासाठी दिला पाहिजे असे आवाहन त्यांनी समाज बांधवांना केले. तसेच अमळनेर तालुक्यातील मराठा तरुणांना उद्योगासाठी आर्थिक महामंडळातून मदत द्यावी असे आवाहन त्यांनी आमदार नरेंद्र पाटील यांना केली.
यावेळी आमदार नरेंद्र पाटील , पारोळा एरंडोल मतदार संघाचे आमदार अमोल पाटील , ढेकू बुद्रुक चे उपसरपंच नत्थू गुणवंतराव सोनवणे , अमळगावचे लोकनियुक्त सरपंच गिरीश पाटील , डीवायएसपी विनायक कोते , पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम , आरटीओ मयूर निकम , जेष्ठ पत्रकार पांडुरंग पाटील यांचा समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. प्रमुख अतिथी खासदार स्मिता वाघ , आमदार अमोल पाटील ,माजी आमदार साहेबराव पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रमुख अतिथी म्हणून सभापती अशोक पाटील ,माजी नगराध्यक्ष विनोद पाटील , माजी जिप सदस्या जयश्री पाटील , तिलोत्तमा पाटील उपस्थित होत्या. यावेळी समाजातील गुणवंत आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्याचा सन्मान करण्यात आला.
प्रास्ताविक अध्यक्ष जयवंतराव पाटील तर सूत्रसंचालन उपाध्यक्ष संजय पाटील यांनी केले. कार्यक्रमास सचिव विक्रांत पाटील ,सहसचिव प्रवीण पाटील , उपाध्यक्ष राजेंद्र देशमुख , कोषाध्यक्ष महेंद्र बोरसे , एस एम पाटील ,मनोहर पाटील ,संजय पाटील , चंद्रकांत काटे ,स्वप्नील पाटील , जे पी पाटील , संजय पुनाजी पाटील , कैलास पाटील , डॉ सुमित पाटील , गौरव पाटील , भूषण भदाणे , सुलोचना वाघ , पद्मजा पाटील यांनी
यांनी देणगी दिली.
यावेळी नथु सोनवणे यांनी एक लाख रुपये , गिरीश पाटील यांनी ५१ हजार , हरीश देधमुख यांनी ११ हजर रुपये, हेमंत पाटील यांनी ११ हजार देणगी दिली. सभापती अशोक पाटील , विक्रांत पाटील , महेंद्र बोरसे यांचाही सन्मान करण्यात आला.