रिपोर्टर नूरखान
अमळनेर : – बंजारा समाजाला हैद्राबाद गॅझेटनुसार अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्गातील आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी आज अखिल भारतीय बंजारा सेना तसेच सकल बंजारा समाजाच्या वतीने अमळनेर येथील प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन सादर करण्यात आले.
महाराष्ट्रातील गोरबंजारा समाजावर आजपर्यंत एस.टी. आरक्षणाबाबत अन्याय झाला असून, हैद्राबाद गॅझेटमध्ये उल्लेख असतानाही अद्याप समाजाला आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही. दुसरीकडे, राज्य सरकारने मराठा–कुणबी एकच असल्याचे मान्य करून, हैद्राबाद गॅझेटच्या आधारे मराठा समाजाला आरक्षणाचा निर्णय घेतला आहे. त्याच न्यायाने गोरबंजारा समाजालाही एस.टी. आरक्षण देण्यात यावे, अशी जोरदार मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी किरण जाधव, प्रकाश मनिराम चव्हाण, मिशीलाल घेवर राठोड, रणजित राठोड, प्रकाश पवार, किशोर पवार, अनिल जाधव, संजय राठोड, ईश्वर पवार, संदीप पवार, रतिलाल पवार, अनिल पवार, अशोक पवार, शाम जाधव, विष्णू जाधव, कृष्णा राठोड यांच्यासह बंजारा समाजातील असंख्य बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अखिल भारतीय बंजारा क्रांती सेनेच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाद्वारे गोरबंजारा समाजाच्या न्यायहक्कांसाठी आवाज उठवण्यात आला असून, शासनाने या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून तातडीने एस.टी. आरक्षण लागू करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.