अमळनेर :- तालुक्यातील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल, अमळनेर येथे आज प्री-प्रायमरी विभागातील लहानग्यांनी रक्षाबंधनाचा पवित्र सण उत्साहात साजरा केला. नर्सरी, ज्युनिअर केजी आणि सीनियर केजीच्या सर्व विद्यार्थ्यांनी स्वतःच्या छोट्याशा हातांनी हँड-मेड राख्या तयार केल्या व आपल्या मित्र-मैत्रिणींच्या हातावर बांधून प्रेम, आपुलकी आणि बंधुत्वाचा संदेश दिला.
कार्यक्रमादरम्यान शाळेत आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते, तर लहानग्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून उपस्थित सर्वांच्या मनात आनंदाची लहर पसरली. हा कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री विनोद अमृतकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली समस्त प्री प्रायमरीच्या शिक्षक वृंदाने पूर्णत्वास नेला.