नागरिकांनो उघडा डोळे पहा नीट.
हे कुठेतरी थांबलं पाहिजे.
१. हेल्मेट न घातल्यास… दंड ₹1,000/-
२. नो-पार्किंगमध्ये वाहन लावल्यानं… दंड ₹3,000/-
३. विमा नसल्यानं… दंड ₹1,000/-
४. दारू पिऊन गाडी चालवल्यास… दंड ₹10,000/-
५. नो-एंट्रीमध्ये गाडी घेतल्यास… दंड ₹5,000/-
६. गाडी चालवताना मोबाईलवर बोलल्यास… दंड ₹2,000/-
६. प्रदूषण प्रमाणपत्र नसलं तर… दंड ₹1,100/-
७. तीन माणसांनी एकाच दुचाकीवर प्रवास केल्यास… दंड ₹2,000/-
१. ट्राफिक सिग्नल नीट नसल्यानं अपघात झाला… जबाबदार कोणीच नाही!
२. रस्त्यात खड्डे… जबाबदार कोणीच नाही!
३. पादचारी मार्ग अतिक्रमित… जबाबदार कोणीच नाही!
४. रस्त्यावर लाईट नाहीत… जबाबदार कोणीच नाही!
५. रस्त्यावर कचरा पसलेला… जबाबदार कोणीच नाही!
६. रस्त्याच्या कडेला लाईटचे खांबच नाहीत… जबाबदार कोणीच नाही!
७. रस्ते खोदून तसेच सोडलेले… जबाबदार कोणीच नाही!
८. एखादा खड्ड्यात पडून जखमी झाला तर… जबाबदार कोणीच नाही!
९. जर गाडीला भटक्या गायी, जनावरे धडकली किंवा कुत्र्यानं चावलं, तरी… जबाबदार कोणीच नाही!
१०. नदी नाल्यावरील फुले तुटतात, शेतकऱ्याला वीज वेळेवर मिळत नाही जी मिळते ते कधी रात्रीला तर कधी दिवसाला तीही वेळेवर राहत नाही, याला जबाबदार कोण..
- सर्वजनिक ठिकाणची स्वच्छता असते ना ओला सुका कचऱ्याची व्यवस्थापन आणि रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे हे अजूनही दुरुस्ती करत नाही याला जबाबदार कोण?
- गटाराचं पाणी रस्त्यावर वाहत असेल, तरी… जबाबदार कोणीच नाही!
असं वाटतं की जणू सर्व गुन्हे फक्त सामान्य माणूसच करतो आणि फक्त त्यालाच दंड भरावा लागतो.
प्रशासन, महापालिका, सरकार यांना कधीच जबाबदार धरलं जात नाही.
कायदे फक्त नागरिकांसाठीच आहेत. सरकारी निष्काळजीपणासाठी कुणालाच जबाबदार धरलं जात नाही.
आपल्यालाच मेहनत करायची, त्रास सहन करायचा, कर भरायचा, दंड भरायचा, सरकारी खजिना भरायचा… आणि मग पुन्हा त्यांनाच सत्तेवर आणायचं!