निवडणूकीचे पडघम वाजायला सुरुवात…
दोंडाईचा- येथील नगर परिषदेचे निवडणूकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. आज दि. 8 रोजी 13 प्रभागांसाठी 26 जागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. यापूर्वी नूकतेच नगराध्यक्षपदाचा बहुमान ओबीसी महिलेला घोषीत झाले आहे. आज जाहीर झालेल्या आरक्षणामुळे निवडणूक आणखीन गतिमान होणार आहे…
दोंडाईचा नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात आज दि. 8 रोजी सकाळी 11 वाजता आरक्षण सोडतसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते…
यावेळी शिरपूरचे उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, मुख्याधिकारी देवेंद्र परदेशी, नगररचनाकार विभागाचे साळुंखे, अभियंता शिवानंद राजपूत यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली…
13 प्रभागातील 26 वार्डांसाठी काढण्यात आलेले आरक्षण सोडत नुसार प्रभाग क्रमांक 1 मधील वार्ड अ- ओबीसी पुरुष ब-सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 2 वार्ड अ- एसटी महिला ब- सर्वसाधारण पुरुष प्रभाग क्रमांक 3 वार्ड अ- ए. सी पुरुष ब-सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक 4 अ- ए.सी महिला ब-सर्वसाधारण पुरुष ब-सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 5 वार्ड अ- ओबीसी पुरुष ब-सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक 6 अ-ओबीसी महिला ब- सर्वसाधारण पुरुष प्रभाग क्रमांक 7 अ- ओबीसी महिला ब- सर्वसाधारण पुरुष प्रभाग क्रमांक 8 अ- ओबीसी पुरुष ब- सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक 9 अ- ओबीसी महिला ब- सर्वसाधारण पुरुष प्रभाग क्रमांक 10 अ- ओबीसी महिला ब- सर्वसाधारण पुरुष प्रभाग क्रमांक 11 अ- एसटी महिला ब-सर्वसाधारण पुरुष प्रभाग क्रमांक 12 अ- एसटी पुरुष ब- सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक 13 अ- एसटी पुरुष ब- सर्वसाधारण महिला याप्रमाणे आरक्षण सोडत काढण्यात आली आहे..
भाजपा शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे, माजी अध्यक्ष प्रविण महाजन, माजी बांधकाम सभापती निखिल जाधव, माजी उपनगराध्यक्ष नबू पिंजारी, जितू गिरासे सर, कृष्णा नगराळे, नरेंद्र गिरासे, चिरंजीव चौधरी, नरेंद्र कोळी, भरतरी ठाकूर, ठाकरे सेनेचे शैलेश सोनार यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी आजी-माजी नगरसेवक सामाजिक राजकीय पदाधिकारी उपस्थित होते.