दोंडाईचा- (श. प्र.) छत्रपती शिवाजी महाराज यांचे विश्वासू अंगरक्षक जिवा महाला यांच्या ३९० व्या जयंती निमित्ताने शहरातील नाभिक समाज नवयुवक मंडळाच्या वतीने भव्य मिरवणूक काढून जेष्ठ नागरिक भवन येथे रक्तदान शिबीर संपन्न झाले..
आज दि. ९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ जिवा महाला यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करून समाज बांधव महेश सैंदाणे यांना जिवा महाला यांची वेशभूषा परिधान करून तसेच त्यांचे मावळे म्हणून अजय ईशी, प्रथमेश सैंदाणे हे झाले होते. यांनी तिघांनी मिरवणूकीचे लक्ष वेधून घेतले होते. सदर मिरवणूकीला येथुन सुरवात करून राजपथ रस्ता, मानराज गल्ली, स्टेशन भाग मार्ग राम मंदिर, महादेवपुरा, जेष्ठ नागरिक भवन येथे संपन्न झाली. दरम्यान त्याठिकाणी मंचावर अध्यक्ष म्हणून बन्सीलाल चित्ते व महिला मंडळाच्या अध्यक्षा वत्सला चित्ते यांना सपत्नीक मान देण्यात आल होता. तसेच जेष्ठ समाजसेवक एम बी बोरसे, शहराध्यक्ष दिलीप सैंदाणे, दुकानदार संघाचे अध्यक्ष अनिल ईशी, युवक मंडळाचे अध्यक्ष राजेश मिस्त्री, ब्लड बँकेचे प्रमुख चौधरी आदी लाभले होते.. यावेळी मान्यवरांनी जिवा महाला यांच्या जिवनपटावर प्रकाशझोत टाकली.
याप्रसंगी नाभिक दुकानदार संघाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र सैंदाणे, तालुकाध्यक्ष रविंद्र चित्ते, माजी अध्यक्ष छोटू महाले, गोकुळ सैंदाणे, बन्सीलाल चित्ते, रमेश मोरे, साहेबराव पवार, छोटू चित्ते, कैलास चित्ते, महेंद्र चित्ते, राजेंद्र मोरे, राजेंद्र सैंदाणे, किरण सुर्यवंशी, अशोक सोनवणे, लोटन पवार, मच्छिंद्र पवार, राजेंद्र सोलंकी, भरत सैंदाणे, बन्सी मोरे, युवक मंडळाचे राजेश मिस्त्री, मुकेश चित्ते, जगदीश ईशी, गुलाब पवार, पत्रकार समाधान ठाकरे, योगेश मिस्त्री भरत वरसाळे, गणेश पवार, रमेश सैंदाणे, श्रावण भदाणे, संदिप पवार, विरेंद्र पवार, सोनू पवार, गोपाल बोरसे, दिनेश बोरसे, बंटी मिस्त्री, योगेश सुर्यवंशी, गोपाल पवार, शिवचरण सुर्यवंशी अजय पवार, जयेश पवार, अर्जुन चित्ते, दिपक सैंदाणे, सागर भदाणे, शरद वरसाळे, जिभाऊ चित्ते, योगेश चित्ते, मल्हारी पवार, विशाल महाले, महिला मंडळाचे महिला देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते…
बंधू भगिनींसह एकूण २५ रक्तदात्यांनी केले रक्तदान……
शिवरत्न जिवाजी महाला यांच्या ३९० वी जयंती निमित्ताने नाभिक युवक मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात आतापर्यंतच्या वयात कधीच पत्रकार समाधान ठाकरे व त्यांची बघिनी नंदा मच्छिंद्र पवार या दोघेही बंधू भगिनींनी रक्तदान केलेले नव्हते. त्या बंधू भगिनींनी पहिल्यादाच रक्तदान केल्याचे समाज बांधवांकडून अभिनंदन करण्यात आले.. या रक्तदान शिबिरात एकूण 25 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान करणाऱ्यांना पाणी पिण्याचा थर्मास भेट वस्तू म्हणून व ब्लड बँक तर्फे प्रमाणपत्र दिले गेले. या रक्तदान शिबिराला धुळे येथील श्रीमती के सी अजमेरा रोटरी बल्ड बँकेचे सहकार्य लाभले.