रिपोर्टर नूरखान
“अल्पसंख्याक युवक असता तर रान पेटवले गेले असते, आम्ही कायद्याच्या मार्गाने लढतो” – एकता संघटनेची भूमिका
जळगाव पोलीस कर्मचाऱ्याचा गंभीर प्रकार – धर्मांतर, द्वितीय विवाह आणि फसवणूक; आरोपी अजूनही फरार, एकता संघटना कायद्याच्या मार्गाने लढणार
जळगाव : जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३५१/२०२५ नोंदविण्यात आला असून, आरोपी पोलीस कर्मचारी नितीन कमलाकर सपकाळे याने कोलकाता येथील एका मुस्लिम युवतीला जबरदस्ती ने धर्मांतर करण्यास भाग पाडून, लग्नाचे प्रलोभन दाखवून पीडितेच्या इच्छेविरुद्ध जळगावच्या वेगवेगळ्या हॉटेलमध्ये अत्याचार केला,स्वतःची पत्नी जिवंत असतानाही दुसरे लग्न मंदिरात करून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
पीडितेला तब्बल सहा महिने जळगाव पोलिसांनी एफ आय आर नोंदवण्यासाठी रावेर , नशिराबाद, एम आय डी सी पो. स्टे.येथे फिरवले गेले आणि अखेर २३सप्टेंबर २५ रोजी जळगाव शहर पो स्टे येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल होऊनही आरोपी पोलीस अद्याप अटकेत नाही, यामुळे न्यायव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आरोपीवर दाखल कलमे : सध्या केवळ बी एन एस कलम ६९, ३१८(२),११५(२) ३५२, ३५१(३) व ३(५) यांनुसार गुन्हा दाखल आहे. परंतु जळगाव जिल्हा एकता संघटनाने जिल्हा पोलीस अधीक्षक व शहर पोलीस निरीक्षकांकडे दिलेल्या अर्जाद्वारे अतिरिक्त भारतीय न्याय संहिता कलमे ८१, ८२, ८३, ८७, १९६, १९८, व २०१ चा या गुन्ह्यात समाविष्ट करण्याची मागणी केली आहे.
संघटनेने स्पष्ट केले की आरोपी पोलिसाने धर्मांतर करून फसवणूकपूर्वक विवाह,
द्विविवाह, खोटी दस्तऐवज मांडणी व लोकसेवक असूनही कायद्याचे उल्लंघन अशी गंभीर कृत्ये केली आहेत.
संविधानिक हक्कांचा भंग : एकता संघटनेचे फारुक शेख यांनी म्हटले की, ही घटना पीडितेच्या धर्मस्वातंत्र्य, वैयक्तिक स्वातंत्र्य व समानतेच्या मूलभूत अधिकारांवर आघात करणारी आहे. आरोपी पोलीस सेवेत असूनही त्याने कायद्याचे उल्लंघन केले आणि विभागानेही सहा महिने एफ आय आर नोंदवण्यास टाळाटाळ केली, हे न्यायव्यवस्थेचे अपयश आहे.
एकता संघटनेच्या मागण्या .
आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला तातडीने अटक व निलंबन करण्यात यावे.
अतिरिक्त कलमे समाविष्ट करून तपास मजबूत करण्यात यावा.
तपास महिला पोलिस अधिकाऱ्यांकडे सोपवून पीडितेचे बयान दुभाषाच्या उपस्थितीत घेण्यात यावे.
पीडितेला जळगावात असताना पोलिस संरक्षण देण्यात यावे.
एफ आय आर मध्ये झालेल्या उशीराबाबत जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.
एकता संघटनेची भूमिका : फारुक शेख
जळगाव जिल्हा एकता संघटने चे समन्वयक फारुक शेख यांनी म्हटले आहे की, “जर हा प्रकार एखाद्या अल्पसंख्याक युवकाने केला असता तर काही हिंदुत्ववादी संघटनांनी समाजात रान पेटवले असते. मात्र आम्ही तसे न करता कायदेशीर मार्गाने न्यायासाठी लढा देत आहोत. हिंसा नव्हे न्याय पाहिजे.
पोलिस अधिकारी व इतरांना या तक्रार अर्ज सादर.
एकता संघटनेने सविस्तर अशी तक्रार पोलिस निरीक्षक, शहर पो स्टे, जळगाव पोलिस अधीक्षक, पोलिस महानिरीक्षक, पोलिस महासंचालक, गृह राज्य मंत्री, महिला आयोग, मानवाधिकार आयोग, अल्पसंख्यक आयोग सह जळगाव जिल्हा महिला संघटनांना सुद्धा याच्या प्रति पाठविल्याआहेत.
शिष्ट मंडळात यांचा होता समावेश.
एकता संघटने चे मुफ्ती खालिद, फारुक शेख, हाफिज रहीम पटेल, मौलाना गुफरान, अनिस शाह, मतीन पटेल, अँड आवेश शेख, रज्जाक पटेल, कासिम उमर, मोहसीन पटेल आदींचा समावेश होता.
पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांना तक्रार अर्ज देताना मुफ्ती खालीद सोबत फारुक शेख, अँड आवेश शेख, हाफिज रहीम पटेल, आदी दिसत आहे.