रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- भारतीय युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष मा. उदय भानू चिब, महाराष्ट्र प्रदेश प्रभारी अजयजी छिकारा, सहप्रभारी शांभवी शुक्ला, प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे आणि उपाध्यक्ष प्रशांत ओगले यांच्या सूचनेनुसार जळगाव जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेसची बैठक नुकतीच पार पडली. ही बैठक जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब पवार यांच्या अध्यक्षतेखाली, तर जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेसचे समन्वयक व प्रदेश महासचिव अंकुश देशमुख यांच्या संयोजनात झाली.
बैठकीदरम्यान ‘वोट चोर गद्दी छोड’ या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. मतचोरीच्या विरोधात युवक काँग्रेसने स्वाक्षरी अभियानाची सुरुवात केली. या अभियानाचा शुभारंभ जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पवार यांच्या स्वाक्षरीने झाला.
या वेळी युवकांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत अधिकाधिक संधी मिळावी, यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असा विश्वास जिल्हाध्यक्ष पवार यांनी व्यक्त केला. मतचोरीच्या विरोधात जनतेच्या मनातील शंका दूर करण्यासाठी कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन जनजागृती करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
बैठकीत किरण पाटील, तुषार संदानशिव, महेश पाटील, सुदर्शन इंगळे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी आपली मते मांडली. यावेळी सलमान तडवी यांनी सूत्रसंचालन केले तर आभार गोविंद देशमुख यांनी मानले.
बैठकीनंतर फुले मार्केट परिसरातील स्थानिक दुकानदारांशी संवाद साधून मतचोरी संदर्भातील शंका दूर करण्यात आल्या आणि जनजागृती करण्यात आली.
या बैठकीस युवक काँग्रेसचे जिल्हा व तालुका पातळीवरील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये मनोज चौधरी, शुभम शिंदे, पंकज पाटील, असद सय्यद, मनोहर महाले, लखन पाटील, धनंजय शिंदे, अमोल देशमुख, हर्षल चौधरी, निखील पाटील, पवन सोनार, अमन शेख, शाहीद पिंजारी आदींचा समावेश होता.