रिपोर्टर नूरखान
अमळनेर – शहरातील गुड बाजार परिसर सध्या अतिक्रमण आणि वाहतूक कोंडीच्या समस्येने त्रस्त आहे. दगडी दरवाज्याजवळील मुख्य रस्त्यावर दुकानदारांनी मोठ्या प्रमाणात दुकानाबाहेर अतिक्रमण करून ठेवले आहे, त्यामुळे त्या रस्त्यावरून ये-जा करणे कठीण झाले आहे.
या अतिक्रमणामुळे मालवाहतूक करणारी मोठी वाहने, आयशर ट्रक, तसेच ट्रॉली इत्यादी रस्त्यावरच तासनतास उभी राहतात. परिणामी, विद्यार्थ्यांना शाळेत जाताना, सायकलस्वार, मोटरसायकलस्वार आणि पायी चालणाऱ्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो.
या प्रकारामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागाने आणि वाहतूक पोलिसांनी तत्काळ लक्ष घालून योग्य कारवाई करणे गरजेचे आहे. अन्यथा नागरिकांना होणारा त्रास अधिकच वाढू शकतो.
नागरिकांची मागणी.
अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवावी.
वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांची नियुक्ती करावी.
शाळेच्या वेळेत वाहतूक सुरळीत ठेवावी,कायमस्वरूपी उपाययोजना करावी.
गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही समस्या केवळ दुर्लक्षामुळे अधिक बिकट झाली आहे. आता तरी प्रशासनाने जागे होऊन ठोस पावले उचलावीत, हीच अपेक्षा.