Tuesday, July 29, 2025
Tuesday, July 29, 2025
Tuesday, July 29, 2025
spot_img
spot_img
A venture of Pen First Media and Entertainment Pvt. Ltd
Member of Working Journalist Media Council Registered by - Ministry of Information and and Broadcasting, Govt. Of India. New Delhi
HomeMarathiकुर्हे बुद्रुक येथे महिला व बाल विकास अंतर्गत झाला पालक मेळावा.

कुर्हे बुद्रुक येथे महिला व बाल विकास अंतर्गत झाला पालक मेळावा.

अमळनेर :- महिला व बाल विकास अंतर्गत आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे ,पालक मेळावा हा शासनाच्या उपक्रमाचा कार्यक्रम ज्ञानवर्धिनी अंगणवाडी केंद्र कुऱ्हे बुद्रुक येथे दिनांक18 रोजी पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि प सदस्य सौ जयश्री अनिल पाटील होते.
यावेळी गटविकास अधिकारी एन आर पाटील, सी डी पी ओ प्रेमलता पाटील, रामेश्वर चे केंद्रप्रमुख गोकुळ पाटील उपस्थित होते.या कार्यक्रमात अंगणवाडी सेविका शितल विजयसिंग पाटील आणि मदतनीस सीमा गिरीश बिऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाने बालकांच्या मातांनी पाककृतीमध्ये आपल्या घरातील खाद्यपदार्थापासून तसेच टी एच आर पासून जास्त प्रोटीन युक्त पदार्थ कसे बनवता येतात हे दाखविले. तसेच टाकाऊ वस्तूंपासून झुंबर बाळाच्या पाळण्याला लावायला रंगीबिरंगी कापडी बॉल तसेच इतर पोस्टरंद्वारे वेगवेगळे साहित्य तयार करून बालकांच्या मेंदूचा विकास कसा होईल व सदृढ बालक कसा होईल याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.असेच उत्कृष्ट पूर्व शालेय शिक्षण अंगणवाडी केंद्रात दिले जाते.कार्यक्रमास गावातील सरपंच ,उपसरपंच, सदस्य, सोसायटीचे चेअरमन, व्हा चेअरमन, संचालक मंडळ माजी सरपंच ,उपसरपंच अंगणवाडी सेविका , मदतनीस ग्रामस्थ मंडळी तसेच ढेकू बीटातील सर्व अंगणवाडी सेविका कार्यक्रमाला उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular