सुरगाणा. प्रतिनिधी.
देशाला स्वातंत्र्य मिळवून ७६ वर्षे उलटली तरी अजून आदिवासींचे पोटापाण्यासाठी होणारे स्थलांतर चालूच आहे. आदिवासींच्या पिढ्यानपिढ्या त्यामुळे अज्ञानी अशिक्षित गरीबच राहिल्या. कोणत्याही सरकारने हे स्थलांतर थांबवण्यासाठी प्रयत्न आजूनपर्यत केलेले नाहीत. त्यामुळे दारिद्र्याची पोटाची खळगी भरण्यासाठी आदिवासी बांधवांची भटकंती अजून चालूच आहे. राज्यातील किती आदिवासी पोटासाठी स्थलांतर करतात याचं रेकॉर्डही नाही.
नाशिक जिल्ह्यातील आदिवासी पाडे ओस पडलेले दिसतात. सुरगाणा या आदिवासीबहुल तालुक्यात पिण्याच्या आणि सिंचनाची पाण्याची मोठी टंचाई असून या भागात एकही मोठं सिंचन प्रकल्प नसल्याने केवळ एक ते दोन टक्के क्षेत्र सिंचनाखाली आहे. सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याने तालुक्यातील बहुतांश नागरिक उन्हाळ्यात रोजगारासाठी शेजारील गुजरात केरळ राज्यस्थान या राज्यामध्ये ही स्थलांतर करावे लागते.
मंंजूरीसाठी आपले गाव तालुका सोडून शेजारच्या तालुक्यात मजुरीसाठी कामाला जाण्यासाठी सुरगाणा तालुक्यातील आदिवासी शेतमजुरांची धावपळ उडाली आहे. सध्या निफाड दिंडोरी नाशिक या तालुक्यामध्ये द्राक्षाच्या व कांदा लागवडीचे कामाचा हंगाम सुरू असून, काही महिन्यासाठी मंजुर आपल्या मुलांच्या शिक्षणाची पर्वा न करता, संसार उघड्यावर मांडण्याची तयारी ठेवून एक दोन महिने पुरेल एवढे स्वयंपाकासाठी लागणारी लाकडे,भाडे, धान्य, कपडे, अंथरूण पांघरूण एका गोणीत बांधून डोक्यावर बिर्हाड घेऊन मजुरांचे स्थलांतर वणी,खेडगाव, पिंपळगाव, विंचूर, दिंडोरी, निफाड, येवला, नाशिक मुक्कामी दाखल झाले आहेत. या शेतमजुरांना कसेबसे काम लागले तर एक मजूर दोनशे ते अडिचशे रुपये रोजाने काम करतात यामध्ये महाविद्यालयीन मुले देखील शाळा कॉलेज सोडून कामा साठी जाताना दिसत आहेत. आपल्या आई वडिलां सोबत किंवा मित्रांसोबत मजुरी करून कुटुंबाला हातभार लावून एका महिन्याचा सुमारे ३ ते ४ हजार रुपये मजुरी एकदाच मिळते वास्तविक सुरगाणा तालुक्यातील पावसाचे प्रमाण जास्तीत जास्त असल्याने नद्या नाले तुडूब भरून वाहतात परंतु पाणी अडविण्याचे सुरगाणा तालुक्यात कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याने सर्व पाणी हे गुजरात राज्याकडे वाहून जाते तालुक्यातील पाझर तलाव, शेततळे सिमेंट बंधारे पाणी आडवा पाणी जिरवा जलयुक्त शिवार यासारख्या योजना निकृष्ट आहेत या कामाकडे लोकप्रतिनिधीनी व शासकीय कर्मचाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे नद्यांचे पाणी अडवले जात नसल्याने विहिरी व कूपनलिका कोरड्याच राहतात त्यामुळे शेतीसाठी तर सोडाच पिण्यासाठी पाणीदेखील कोसो दूर डोक्यावरून पाणी आणावे लागते ही वस्तुस्थिती आहे पावसाळी पीक घेतल्यानंतर कोणतेच पीक होत नाही म्हणून शेतीची कामे आवरून सुरगाण्यातील शेतमजूर शेतकरी आपल्या परिवाराला सोबत घेऊन शेतमजुरीशिवाय पर्याय नसतो. पावसाच्या पाण्यावर नागली,भात, वरी,खुरसानी, उडीद,तूर व कुळीद ही पिके घेतली जातात. जमिन ओलीताखाली यावी या साठीस स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रशासन यानी लक्ष देण्याची गरज आहे.
प्रतिक्रिया ;-
सुरगाणा तालुक्यात मोठे प्रकल्प होण्याच्या फक्त मागील पाच वर्षापासून आम्ही घोषणा ऐकत आलो आहे ते प्रकल्प कधी होतील आणि आमच्या स्थलांतर कधी थांबेल हा प्रश्न आता मला पडला आहे की हे फक्त आश्वासन असून ते फक्त आश्वासनच राहणार का .
श्री मोतीराम भोये
नागरिक सुरगाणा तालुका