प्रताप कुमार नवयुवक मित्र मंडळाचा उपक्रम.
अमळनेर :-
शहरातील प्रताप नगर भागातील प्रताप कुमार नवयुवक मित्र मंडळाच्या वतीने भोलेनाथ मंदिराजवळ गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून, गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
मंडळाकडून मागील ५ ते १० वर्षांपासून गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. स्थानिक नागरिक, लहानग्यांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांचेच या उत्सवात उत्स्फूर्त सहभागी असतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही दहा दिवस विविध मान्यवरांकडून आरत्या संपन्न होत आहेत.
आजच्या आरतीचे मानकरी अर्बन को-ऑप. बँकेचे चेअरमन तथा सरस्वती विद्यामंदिराचे मुख्याध्यापक मा. रणजित शिंदे हे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते सायंकाळी ८ वाजता आरती संपन्न झाली.
यावेळी प्रताप कुमार नवयुवक गणेश उत्सव मित्र मंडळाचे सदस्य तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरतीनंतर मंडळाच्या वतीने मान्यवरांचे स्वागत व आभार व्यक्त करण्यात आले.