- मविआतर्फे सत्कार करतांना डॉ. बी.एस. पाटील.
अमळनेर :- सलग अर्ध शतक पत्रकारितेत योगदान देत आलेल्या येथील ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग पाटील यांना अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेने दिलेला राज्यस्तरीय पुरस्कार हा यथोचितच आहे. या पुरस्काराच्या रुपाने आपल्या अमळनेरचे नाव त्यांनी महाराष्ट्रावर नेले असल्याचा गौरवोद् गार माजी आमदार आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते डॉ.बी.एस.पाटील यांनी रविवारी सायंकाळी त्यांच्या हस्ते पांडुरंग पाटलांचा सत्कार करतेवेळी काढले.
येथील स्टेशनरोडवरील शिवम पेट्रोल पंपाला लागून असलेल्या हॉल मध्ये महाराष्ट्र विकास आघाडीतर्फे आयोजित सोहळ्यात डॉ.बी.एस.पाटील हे बोलत होते.
पांडुरंग पाटील यांचा अमळनेर तालुक्याचा सर्वांगीण अभ्यास झाला आहे. त्यांनी ते लिहून काढीत एक पुस्तक काढावे अशी अपेक्षा प्रा.अशोक पवार यांनी व्यक्त केली.
त्याच बरोबर प्रा.पवार हे दुसऱ्या मुद्याकडे वळले, राज्याच्या विधी मंडळाच्या दोनही सभागृहात बहुमताच्या बळावर जन संरक्षण विधेयक सत्ताधाऱ्यांनी मंजूर करुन घेतले आहे. मूळात ते विधेयक राज्याला हुकूमशाहीकडे नेणारे असल्याने त्या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होण्यापूर्वी मविआला आंदोलन छेडीत त्याला कडाडून विरोध दर्शवायचा असल्याची प्रा.पवार यांनी टिपणी केली.
आजच्या मुख्य सोहळ्याचे सत्कारार्थी पांडुरंग पाटील यांच्यावर मनोहर नाना, बी.के.सुर्यवंशी, निवृत्त पो.नि. हिरामण कंखरे, शांताराम सर, चंद्रशेखर भावसार, गजेंद्र साळुंखे, मनोज बी.पाटील आदिंनी मनोगतं व्यक्त केली.
पांडुरंग पाटील यांनी आता राजकारणात यावे असा रेटा बन्सिलाल भागवत यांनी लावून धरला. त्यावर पांडुरंग पाटील यांनी ही ऑफर नम्रपणे नाकारली. त्यापेक्षा मला पत्रकार म्हणूनच जगू द्या. कारण मी माझे जीवन पत्रकारितेला समर्पित केले आहे. मी जूना दुहेरी पदवीधर आहे. त्या काळात मला सहज नोकरीच्या संधी येत होत्या; पण मी पूर्णवेळ पत्रकारिताच करायचे ठरविले होते. मी कोण्या पक्षाचा बांधील राहू ईच्छित नाही. पत्रकारितेत निवृत्ती नसते. माझ्याने होईल तोपर्यंत मी पत्रकारिता रुपी व्रत जोपासत राहील; असे पांडुरंग पाटील यांनी स्पष्ट केले.
यावेळी निवृत्त शिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे, योजना पाटील मॅडम, अरुण शिंदे सर, एस.सी.तेले, चिंधू वानखेडे, के.व्ही.नाना, पी.वाय.तात्या, डॉ. रविंद्र पाटील, मुन्ना भाऊ शर्मा, प्रकाश पाटील, अरुण बापू देशमुख, प्रकाश पाटील, मोहन भोई, वासुदेव मामा, शांताराम कोळी आदि काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, उबाठा शिवसेनेचे कार्यकर्ते बहु संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक डी.एम.पाटील, सूत्र संचलन डी.ए. पाटील तर आभार गजेंद्र साळुंखेंनी मानले. पाटलांना पुरस्कार यथोचितच
– मविआतर्फे सत्कार करतांना डॉ. बी.एस. पाटील
अमळनेर – सलग अर्ध शतक पत्रकारितेत योगदान देत आलेल्या येथील ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग पाटील यांना अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेने दिलेला राज्यस्तरीय पुरस्कार हा यथोचितच आहे. या पुरस्काराच्या रुपाने आपल्या अमळनेरचे नाव त्यांनी महाराष्ट्रावर नेले असल्याचा गौरवोद् गार माजी आमदार आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते डॉ.बी.एस.पाटील यांनी रविवारी सायंकाळी त्यांच्या हस्ते पांडुरंग पाटलांचा सत्कार करतेवेळी काढले.
येथील स्टेशनरोडवरील शिवम पेट्रोल पंपाला लागून असलेल्या हॉल मध्ये महाराष्ट्र विकास आघाडीतर्फे आयोजित सोहळ्यात डॉ.बी.एस.पाटील हे बोलत होते.
पांडुरंग पाटील यांचा अमळनेर तालुक्याचा सर्वांगीण अभ्यास झाला आहे. त्यांनी ते लिहून काढीत एक पुस्तक काढावे अशी अपेक्षा प्रा.अशोक पवार यांनी व्यक्त केली.
त्याच बरोबर प्रा.पवार हे दुसऱ्या मुद्याकडे वळले, राज्याच्या विधी मंडळाच्या दोनही सभागृहात बहुमताच्या बळावर जन संरक्षण विधेयक सत्ताधाऱ्यांनी मंजूर करुन घेतले आहे. मूळात ते विधेयक राज्याला हुकूमशाहीकडे नेणारे असल्याने त्या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होण्यापूर्वी मविआला आंदोलन छेडीत त्याला कडाडून विरोध दर्शवायचा असल्याची प्रा.पवार यांनी टिपणी केली.
आजच्या मुख्य सोहळ्याचे सत्कारार्थी पांडुरंग पाटील यांच्यावर मनोहर नाना, बी.के.सुर्यवंशी, निवृत्त पो.नि. हिरामण कंखरे, शांताराम सर, चंद्रशेखर भावसार, गजेंद्र साळुंखे, मनोज बी.पाटील आदिंनी मनोगतं व्यक्त केली.
पांडुरंग पाटील यांनी आता राजकारणात यावे असा रेटा बन्सिलाल भागवत यांनी लावून धरला. त्यावर पांडुरंग पाटील यांनी ही ऑफर नम्रपणे नाकारली. त्यापेक्षा मला पत्रकार म्हणूनच जगू द्या. कारण मी माझे जीवन पत्रकारितेला समर्पित केले आहे. मी जूना दुहेरी पदवीधर आहे. त्या काळात मला सहज नोकरीच्या संधी येत होत्या; पण मी पूर्णवेळ पत्रकारिताच करायचे ठरविले होते. मी कोण्या पक्षाचा बांधील राहू ईच्छित नाही. पत्रकारितेत निवृत्ती नसते. माझ्याने होईल तोपर्यंत मी पत्रकारिता रुपी व्रत जोपासत राहील; असे पांडुरंग पाटील यांनी स्पष्ट केले.
यावेळी निवृत्त शिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे, योजना पाटील मॅडम, अरुण शिंदे सर, एस.सी.तेले, चिंधू वानखेडे, के.व्ही.नाना, पी.वाय.तात्या, डॉ. रविंद्र पाटील, मुन्ना भाऊ शर्मा, प्रकाश पाटील, अरुण बापू देशमुख, प्रकाश पाटील, मोहन भोई, वासुदेव मामा, शांताराम कोळी आदि काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, उबाठा शिवसेनेचे कार्यकर्ते बहु संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक डी.एम.पाटील, सूत्र संचलन डी.ए. पाटील तर आभार गजेंद्र साळुंखेंनी मानले.