अमळनेर :- तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय ना.अजित दादा पवार यांच्या उपस्थितित दिनांक 17/08/2025 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्हा मेळावा संपन्न होणार आहे.
या मेळाव्याच्या पूर्व तयारीसाठी व नियोजना संदर्भात दि. 10/08/2025 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव मध्यवर्ती कार्यालय येथे माजी मंत्री व पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष मा. अनिल दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.या मेळाव्यात जिल्ह्यातील अनेक मान्यवरांचा प्रवेश होणार असून सदर मेळावा यशस्वी करणेसाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातुन किमान हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहतील असे नियोजन करण्यात येत असून यासाठी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे.व तसेच सर्वांना मेळावा यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
या बैठकीला माजी आमदार मा. गुलाबराव देवकर, माजी आमदार मा.कैलास बापू पाटील
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जळगाव जिल्हाध्यक्ष मा. संजयजी पवार, रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष मा. उमेशजी नेमाडे, जिल्हा कार्याध्यक्ष मा.योगेशजी देसले, प्रदेश सरचिटणीस मा.रवींद्र नाना पाटील,शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील, महिला जिल्हाध्यक्ष सौ. कल्पनाताई पाटील, महानगराध्यक्ष सौ.मीनलताई पाटील, जळगांव युवक जिल्हाध्यक्ष मा.भूषण भदाणे, रावेर युवक जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडिया, युवक प्रदेश सरचिटणीस कुशल देशमुख, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष सनी गायकवाड,
जळगांव युवती जिल्हाध्यक्ष मोनालीका पवार, रावेर युवती जिल्हाध्यक्ष भाग्यश्री ठाकरे, डॉ महेश पवार,कल्पना ताई अहिरे, लताताई मोरे, युवक कार्याध्यक्ष नाटेश्वर पवार, सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष करण साळुंखे, जिल्हा उपाध्यक्ष रमेश बापू व सर्व तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष पदाधिकारी उपस्थित होते.