रिपोर्टर नूरखान
३६५ दिवस काम, थेट पोलीस भरती व राज्य कर्मचारी दर्जाची मागणी.
अमळनेर : येथील होमगार्ड सैनिकांनी आपले हक्क आणि मागण्या मांडत आमदार बच्चू कडू यांना निवेदन दिले. यामध्ये होमगार्डना ३६५ दिवस नोकरी, थेट पोलीस भरती, राज्य कर्मचारी दर्जा, पेन्शन व इतर सुविधा मिळाव्यात, अशी मागणी करण्यात आली.यावेळी दिलेल्या निवेदनात पुढील प्रमुख मागण्या नमूद करण्यात आल्या आहेत.
वर्षभर म्हणजे ३६५ दिवस नियमित सेवा मिळावी.
‘निष्काम सेवा’ हे जुने ब्रीदवाक्य बदलून नविन युगानुसार सुधारित करावे. होमगार्ड अधिनियम १९४७ मध्ये सुधारणा करून नवीन शासन निर्णय लागू करावा.तीन वर्षे सेवा दिल्यानंतर कायम नियुक्तीचा पर्याय बंद करावा.सलग पाच वर्ष सेवा दिल्यानंतर पोलीस शिपाई किंवा अमलदार पदावर थेट नियुक्ती द्यावी.राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सुविधा, सवलती व विमा संरक्षण लागू करावे.पोलिसांप्रमाणे समान कामासाठी समान वेतन मिळावे. होमगार्डना राज्य कर्मचारी दर्जा द्यावा.निवृत्त होमगार्ड कर्मचाऱ्यांना दरमहा १५,००० रुपये पेन्शन मंजूर करावे.
सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षांपर्यंत वाढवावे.
या निवेदनावर राकेश चौधरी, गणेश लांडगे, जितेंद्र पवार, जितेंद्र महाजन, रविंद्र महाले, रामकृष्ण चौधरी, दत्तात्रय पाटील, अशपाक शेख, भूषण शिंदे, महिला होमगार्ड वैष्णवी पाटील आदींच्या सह्या असून सर्व जण उपस्थित होते.