Thursday, July 31, 2025
Thursday, July 31, 2025
Thursday, July 31, 2025
spot_img
spot_img
A venture of Pen First Media and Entertainment Pvt. Ltd
Member of Working Journalist Media Council Registered by - Ministry of Information and and Broadcasting, Govt. Of India. New Delhi
HomeMarathiकथा आहे एका मुलीची जिच्यावर खूप निर्दयीपणे बलात्कार केला जातो.

कथा आहे एका मुलीची जिच्यावर खूप निर्दयीपणे बलात्कार केला जातो.

अतिशय सुंदर कथा आहे नक्की वाचा.

अमळनेर :- ती स्वतःवर झालेल्या या अन्यायाविरुद्ध आवाज उठण्याचा प्रयत्न करते पण तिचं लग्न त्याचं मुलासोबत लावल जात.लग्न होत पण त्या सात फेऱ्यांमध्ये ती लग्नाच वचन घेत नाही प्रत्येक फेऱ्यात ती वचन घेते त्याला नामोहरम करण्याच, त्याला आयुष्यातून उठवण्याच पण, या सगळ्या घटनांमध्ये आहे एक रहस्य जे कुणालाच माहीत नाही .काय असेल ते रहस्य?का केलं असेल त्याने हे सगळं?स्वतःचं साम्राज्य उभं करणाऱ्या त्या सम्राटाला एक प्यादा बनुन मात देऊ शकेल का ती? जाणून घेण्यासाठी नक्की वाचा.आघात ….!!

“सोड मला , मी म्हटल सोड मला” ती त्या भारदस्त शरीर असलेल्या व्यक्तीला दूर करण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती.” सोडू ? तुला सोडू? मग तुला कळणार कसं की या सत्याच्या वाटेला जाण्याचे काय परिणाम होतात ते? “तो एकाच हाताच्या पंज्यात तिचा जबडा पकडत म्हणाला.खोलीत काळाकुट्ट अंधार होता त्यामुळे तिला त्या माणसाचा चेहरा दिसत नव्हता पण स्पर्शाने तो अगदी आडदांड शरीराचा आहे एवढंच तिला कळत होतं.ती एकदम नाजूक कळी आणि तो एक अजस्र पहाड तिच पूर्ण शरीर त्याच्या एकाच हातात बसत होत एवढी ती नाजूक होती.” काय बिघडवलय मी तुझ?” ती अजूनही दोन्ही हातांनी त्याचा प्रतिकार करत होती पण त्याचे ते राकट हात तिच्या सर्वांगावरुन अगदी सापासारखे वळवळत फिरत होते.तिच्या प्रश्नाने मात्र तो एकदम क्रूरपणे हसला त्याच्या हसण्याचा आवाज एवढा मोठा होता की त्या आवाजाने तिचा आत्माही थरथरला.” प्लीज अस नको करुस . मला माहित नाही मी तुझं काय बिघडवलय पण जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ कर.. मी हात जोडून तुझी माफी मागते, प्लीज मला सोड.. मी खूप सर्वसाधारण मुलगी आहे माझ्याकडे माझ्या पावित्र्याशिवाय दुसरं काहीही नाही प्लीज मला सोड….प्लीज” ती आता अगदी रडकुंडीला आली होती इतकावेळ त्याच्यासोबत झटापट करणारी ती आता धाय मोकलून रडत होती आणि हेच तर त्याला हवं होतं तिचा तो प्रतिकार त्याच्या डोक्यात जात होता पण जेव्हा ती रडायला लागली तेव्हा त्याला एक वेगळच आत्मिक समाधान मिळाल.त्याने पाठीमागून जोरात तिचे केस हातात पकडले तशी ती विव्हळली.”आह ssss”त्याचा चेहरा एकदम तिच्या चेहऱ्याजवळ आला होता त्याने खूप जास्त दारू पिलेली होती त्यामुळे त्या वासानेच तिला आता मळमळायला लागलं होतं.”कालपनिक नाव” नीट लक्षात ठेव आणि हेही लक्षात ठेव की हा सत्या जेव्हा एखाद्याला शिक्षा द्यायच ठरवतो तेव्हा तो कधीच माघार घेत नाही.”एवढं बोलून त्याने एकाच हाताने तिची साडी ओढली तशी ती एखाद्या बाहुलीसारखी गोल गोल फिरत खाली पडली.किती खुश होती ती सकाळी कारण आज तिच्या कॉलेजमध्ये साडी डे होता … किती दिवसांपासून ती या दिवसाची वाट बघत होती कारण तिला साडी नेसण्याच खूप वेड होतं आईचं सगळं कपाट खाली घेऊन त्यातून तिने एक सुंदर अशी साडी स्वतःसाठी निवडली होती साडी नेसल्यावर एखाद्या अप्सरेलाही लाजवेल एवढी ती सुंदर दिसत होती.तिचं ते लेण्यांसारखं कोरीव शरीर अजूनच उठावदार दिसत होतं घरातून निघताना आईने तिची दृष्ट काढली होती बाबांनी पण नकळतपणे आपली परी मोठी झाली म्हणून कपाळावर ओठ टेकवले होते , छोटी राधा, ताई तू खूप भारी दिसतेस करूया का तुझं लग्न असं म्हणत तिला चिडवत होती.पूर्ण दिवस किती सुंदर गेला होता तिचा कॉलेजमध्ये मित्र-मैत्रिणींसोबत हसत खेळत तिचा दिवस पार पडला होता अगदी न थकता तिने प्रत्येकासोबत फोटो काढले होते पण त्या बिचारीला हे माहीत नव्हतं की जेवढ्या आनंदात तिचा दिवस गेला होता तितक्याच दुःखात आणि त्रासात तिची रात्र सरणार होती आणि याच रात्रीपासून सुरू होणार होता सूडाचा एक आगळा-वेगळा खेळ.त्याने तिची साडी तिच्या देहापासून बाजूला केली तसं तिने दोन्ही हाताने स्वतःच शरीर झाकण्याचा निरर्थक प्रयत्न केला.. खोलीत इतका अंधार होता की काहीच दिसत नव्हतं पण त्या अंधारातही त्याची ती वासनांध नजर तिला जाणवत होती.” मी…मी काहीच नाही केलं…प्लीज मला जाऊद्या”ती एखादया लहान मुलीसारखी रडत होती. पण जेवढी ती रडत होती तेवढीच त्याला समाधान मिळत होतं तो तिच्या दिशेने सरसावला तशी ती मागे सरकली तिच्या धक्क्याने टेबलवर असलेल्या फ्लॉवर पॉट खाली पडून फुटला त्याच गुलदस्त्या सारखं आज तिच्या चारित्र्याला पण तडा जाणार होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular