दुग्धजन्य पदार्थ निर्मितीवर हिंगोणा येथे अन्नप्रक्रिया प्रात्यक्षिकाचे आयोजन, कृषिदूतांनी दिले धडे!
यावल (प्रतिनीधी )
ग्रामीण कृषि । जागरूकता अणि कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शासकीय कृषि महाविद्यालय, मुक्ताईनगर येथील
शिरीष कांबळे, प्रज्वल पाटील, तेजस वेताळ, ओम स्वामी, प्रथमेश शेळके व आदित्य पवार ह्या कृषिदूतांनी,
हिंगोने या गावात अन्न प्रक्रिया आणि साठवणूक या विषयाचे दुग्धजन्य पदार्थ तयार करण्याचे प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते, या मध्ये मानवी जीवनात दूधाचं काय महत्व आहे? व दुग्धजन्य पदार्थ बनवून आपण अधिक उत्पन्न कसे मिळवू शकतो? हे शेतकऱ्यांना प्रात्यक्षिके द्वारे दाखून दिले.
या कार्यक्रमासाठी कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. संदीप पाटील, ग्रामीण कृषि जागरूकता व कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाचे चेअरमन डॉ. दत्तात्रय पाचारणे, कार्यक्रम समन्वयक डॉ. बाळासाहेब रोमाडे, कार्यक्रम अधिकारी डॉ. सागर बंड व विविध विषयातील विषय विशेषज्ञ यांचे मार्गदर्शन लाभले होते.