हायस्कूल शिक्षक झाला हैव्हाण विध्यार्थीला लाथा बुक्याने मारहाण.
मारवड हायस्कूल शिक्षकावर कारवाईची पालकांनकडून मागणी.
अमळनेर : याबाबत माहिती अशी की तालुक्यातील मारवड सुरजमल हिरालाल मंदडे हायस्कूल येथे एका शिक्षकाकडून विद्यार्थ्यास बेदम मारहाण करण्यात आली असून संजय बागूल असे शिक्षकाचे नाव आहे. विद्यार्थ्यांने शालेय पोषण आहारात उंदीराची लेंडी आढळल्याने त्याने तो पोषण आहार फेकून दिले त्याचे कारण न विचारता शिक्षकाने सरळ मारहाण केली असल्याने विद्यार्थ्यास जबर मार लागला आहे. हा मार काठीने मारल्याने सुमारे पाच ठिकाणी वळ आले होते. त्यास अमळनेर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असता त्यावर उपचार करण्यात आले व आज विद्यार्थ्याची प्रकृती स्थिर आहे.
दरम्यान शिक्षकावर कारवाई व्हावी अशी मागणी विद्यार्थ्याच्या पालकांकडून करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त लवकरच प्रकाशित करण्यात येईल.
