अमळनेर : स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये आज जन्माष्टमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळा भगव्या आणि पिवळ्या रंगात सजून नटली होती. प्री-प्रायमरीच्या चिमुकल्यांनी सादर केलेल्या मनमोहक नृत्यांनी उपस्थितांची मने जिंकली. श्रीकृष्णाच्या बाललीलांचे सजीव चित्रण करताना त्यांचा उत्साह आणि सादरीकरण पाहून पालक व शिक्षकांनी भरभरून टाळ्या वाजवल्या.
यानंतर महिला शिक्षिकांनी सादर केलेला कृष्णजन्माचा नाट्यप्रयोग हा कार्यक्रमाचा विशेष आकर्षण ठरला. भजन, संवाद व अभिनयाच्या सुरेख संगमातून साकारलेली ही रंगभूमी सर्वांच्या मनात भावनिक आणि भक्तिभावाची लहर निर्माण करून गेली.
कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक श्री विनोद अमृतकर सर यांनी उपस्थितांचे मन:पूर्वक आभार मानत सांगितले की, “अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीबद्दल प्रेम व जाणीव निर्माण होते, तसेच त्यांची सर्जनशीलताही बहरते.