wahid kakar
9421532266
सातपुड्याच्या दुर्गम भागात रस्ते वीज मोबाईल नेटवर्क शाळा नसलेल्या दुर्गम आदिवासी पाड्यांमध्ये यावर्षी पहिल्यांदाच स्वातंत्र्य दिवस सर्व लोकांच्या सहभागाने साजरा करण्यात आला. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातल्या उडद्या, पाटपाडा, खापरमाळ परिसरात काही पाड्यात अजून पर्यंत स्वातंत्र्यदिनी सार्वजनिक ध्वजारोहण झालेले नव्हते, यंग फाउंडेशन व डीजेड फाउंडेशनच्या माध्यमातून शाळाबाह्य मुलांसाठी सुरू असलेल्या निसर्ग संवाद शिकवणी वर्गात शिकणाऱ्या मुलांनी पहिल्यांदाच प्रभात फेरी काढून देशभक्तीपर घोषणा दिल्या.
खरंतर या भागात अलीकडे ग्रामपंचायती झालेल्या आहेत ग्रामसेवक व सरकारी यंत्रणांनी इकडे स्वातंत्र्यदिनी सार्वजनिक ध्वजारोहण करणे गरजेचे होते मात्र कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याने इकडे येऊन स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्याची तसदी घेतली नाही.या भागात अद्याप विकास पोहचलेला नाही अन स्वातंत्र्य दिनही कधी साजरा झालेला नाही. किमान संविधानाचे महत्त्व तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा प्रकारचे राष्ट्रीय सण उत्साहात साजरे करणे गरजेचे आहे. आदिवासी पाड्यातील ग्रामस्थांनी व बच्चे मंडळींनी स्वातंत्र्य दिनाच्या या पहिल्या वहिल्या कार्यक्रमात अतिशय आनंदाने व उत्साहाने सहभाग घेतला ही गोष्ट आमच्यासाठी खूप आनंददायी ठरली.
नर्मदेच्या खोऱ्यातील या पाड्यात स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यासाठी मंदार कर्वे Trilok Khairnar,Ashish Agashe डाँ.कविता, ही मित्रमंडळी वेळ काढून सातपुड्यात आली व स्वातंत्र्य दिनाच्या या उत्सवात सहभागी झालेत…धन्यवाद मित्रानो