रिपोर्टर नूरखान
धुळे जिल्ह्यातील गुणवंत शिक्षिकेचा गौरव.
अमळनेर :- धुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षिका सौ. सुवर्णा श्रीकांत वाघ यांनी जून 2025 मध्ये झालेल्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) इंग्रजी विषयात उल्लेखनीय यश मिळवले आहे. त्यांनी 300 पैकी 176 गुण (58.67%) प्राप्त करून ही परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे.
सौ.वाघ यांची मागील वर्षी शिक्षण सेवक म्हणून ‘पवित्र पोर्टल’मार्फत सेमी-इंग्रजी शिक्षकपदी जिल्हा परिषद, धुळे येथे नियुक्ती झाली होती. त्या सध्या प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.
त्यांचा शिक्षण प्रवास अत्यंत प्रेरणादायी असून, कौटुंबिक जबाबदाऱ्यांबरोबरच त्यांनी एम.ए. इंग्रजी व बी.एड ही उच्च शैक्षणिक पात्रता विशेष प्राविण्याने संपादन केली आहे. यापूर्वी त्यांनी CTET (दोन्ही पेपर), TET आणि TAIT या सर्व परीक्षांमध्ये यश मिळवले असून, त्यांचा शैक्षणिक क्षेत्रात संशोधन आणि उच्च शिक्षणासाठी पुढे जाण्याचा दृढ मानस आहे.
सौ.वाघ या प्रताप महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य व इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. दत्तात्रय वाघ व माजी शिक्षिका सौ. अरुणा वाघ यांच्या सून असून, झेड. बी. पाटील महाविद्यालय, धुळे येथील सहाय्यक प्राध्यापक श्रीकांत वाघ यांच्या पत्नी आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवरांनी अभिनंदन व्यक्त केले आहे. धुळे जिल्हा परिषदेंतर्गत सन्माननीय अधिकारी वर्ग, माननीय प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. किरण जयप्रकाश कुंवर, शिंदखेडा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी डी. एस. सोनवणे तसेच मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने त्यांचे अभिनंदन केले.
त्यांना एस.एस.व्ही.पी.एस. कला व वाणिज्य महाविद्यालय, डी. डी. विसपुते शिक्षण महाविद्यालय, झेड. बी. पाटील महाविद्यालय, धुळे व प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथील आदरणीय प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.
माजी प्राचार्य डॉ. एस. आर.चौधरी, प्रा.लीलाधर पाटील, डॉ. राजा दीक्षित, डॉ. एल. ए. पाटील, डॉ. प्रभाकर महाले, डॉ. हर्षवर्धन जाधव, डॉ. विजय तुंटे, प्रा. सुधीर पाटील, प्रा.डी.के. सैन्दाणे, प्रा.अनिल महाले, लक्ष्मीकांत सैन्दाणे, एस. के. लोहकरे, राजेंद्र चव्हाण, इंजि. प्रशांत वसईकर, डॉ.अनिल बैसाणे व इतर अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.