अमळनेर:- शहरातील सायरदेवी बोहरा सेंट्रल स्कूल मध्ये 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद समिती सदस्य जिल्हा सौ. जयश्रीताई पाटील, गौरव बोहरा सर, डॉ. नम्रता बोहरा मॅडम , मिल्ट्री रिटायर्ड नायक योगेश कापडणे सर, तसेच शाळेचे मुख्याध्यापक जितेंद्र सिंह व पालक हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात जयश्रीताई पाटील यांनी भारतमातेच्या प्रतिमा पूजनाने केली. त्यानंतर ध्वजारोहण करण्यात आले . विद्यार्थ्यांनी झेंडागीत गायन केले . विद्यार्थी व शिक्षकांची भाषणे झाली.
तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा पार पडला.तसेच जयश्रीताई नी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री.जितेंद्रसिंह सरांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक, विद्यार्थी,व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने पार पडला.