Nasik – Staff Reporter
शालिमार मार्गावरून त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर असलेल्या सरडा सर्कलजवळ दररोज दुपारी आणि सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. परिसरातील शाळा व महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या सुमारे ७००० विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना आणि प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

नेशनल कॅम्पस, सरडा सर्कल नाशिक ही संस्था केजी ते पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंतचे शिक्षण देणारे एक प्रतिष्ठित शैक्षणिक संकुल आहे. येथून दररोज हजारो विद्यार्थी या मुख्य रस्त्याने प्रवास करतात. मात्र, सरडा सर्कलचे मोठे आकारमान आणि अपुरी वाहतूक व्यवस्था यामुळे परिसरात वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे.
नेशनल कॅम्पसचे वरिष्ठ क्रीडा शिक्षक शेख नदीम झैनुद्दीन यांनी सांगितले की,
“सरडा सर्कलचे मोठेपण हेच सध्या वाहतूक अडचणीचे प्रमुख कारण बनले आहे. शाळा सुटण्याच्या वेळी ट्राफिकचा ताण वाढतो, आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात येते. प्रशासनाने तातडीने सरडा सर्कल कमी करून योग्य रचना करावी, ही आमची मागणी आहे.”
स्थानिक नागरिक, शिक्षकवर्ग आणि पालकवर्गाने प्रशासनाकडे तात्काळ कारवाई करून वाहतूक नियंत्रण, विद्यार्थी सुरक्षेच्या उपाययोजना आणि सरडा सर्कल लहान करण्याची मागणी केली आहे