Tuesday, July 29, 2025
Tuesday, July 29, 2025
Tuesday, July 29, 2025
spot_img
spot_img
A venture of Pen First Media and Entertainment Pvt. Ltd
Member of Working Journalist Media Council Registered by - Ministry of Information and and Broadcasting, Govt. Of India. New Delhi
HomeBusinessसंत नामदेव महाराज मंदिर येथे प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र सन्मानचिन्ह उपमुख्यमंत्री एकनाथ...

संत नामदेव महाराज मंदिर येथे प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र सन्मानचिन्ह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आला.

अमळनेर :- पांढरपुर येथे संत शिरोमणी नामदेव महाराज परिवार व संत जनाबाई यांच्या षष्ठशतकोत्तर (६७५ वा) संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त भक्त शिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संत नामदेव महाराज यांच्या वंशाच्या कडून संत नामदेव महाराज मंदिर येथे प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.

संत नामदेव महाराजांचे जन्मस्थान हे चालते बोलते विद्यापीठ आहे. संत नामदेव महाराज यांनी भागवत धर्माची पताका महाराष्ट्र बाहेर नेली, रुजवली व वाढवली. त्यामुळे वारकऱ्यांना देशभर प्रतिष्ठा आहे. तसेच वारीच्या माध्यमातून देशभरातून लाखो भाविक पंढरपूरात येतात आणि त्यांच्या सुख, समृद्धी व सेवेसाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले. संत नामदेव महाराजांच्या जन्मभूमीवर पुरस्कार मिळणे हे मी माझे भाग्य समजतो. तसेच हा पुरस्कार वैयक्तिक सन्मान मानण्याऐवजी सहकाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे फळ म्हणून स्वीकारल्याची भावना व्यक्त केली. हा पुरस्कार कोणत्याही पदापेक्षा मोठा असल्याचेही त्यांनी म्हटले.

यावेळी सर्वश्री आमदार समाधान आवताडे, अभिजीत पाटील, उत्तम जानकर, माजी आमदार शहाजी बापू पाटील, माजी आमदार जयवंत जगताप, सकल संत वंशज तथा संत समाधी संस्थान प्रमुख, विश्वस्त, फडकरी, जेष्ठ कीर्तनकार मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular