श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा : वस्त्रोद्योग मंत्री सावकारे यांनी घेतले दर्शन.
अमळनेर : येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरात श्री मंगळग्रह देवाच्या जन्मोत्सव महासोहळ्यांतर्गत तीन दिवसीय महासोहळा पर्व सुरू झाला आहे. ३१ ऑगस्ट रोजी दोन सत्रांत ७२ मानकरींच्या हस्ते नवकुंडी महाविशेष शांतीयाग झाला. तत्पूर्वी मंदिर परिसरातील विश्वातील एकमेव असलेल्या त्रिशुलात्मक श्री कालभैरव व श्री भैरवी माता यांच्या मंदिराचे कलशारोहण फैजपूर येथील सतपंथाचे महामंडलेश्वर श्री जनार्दन हरिजी महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कलशारोहण करतांना कळसाजवळ त्यांच्या सोबत मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ.डीगंबर महाले होते. दरम्यान, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी म श्री मंगळग्रह देवाचे सपत्नीक दर्शन घेतले.
३१ रोजी नवकुंडी महाविशेष शांतीयागाच्या सकाळी ९ ते १२ वाजेच्या सत्रात खासदार स्मिता वाघ, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, पोलीस आयुक्त प्रशांत बच्छाव, प्रांताधिकारी नितीनकुमार मुंडावरे, पोलीस उपअधीक्षक वासुदेव देसले,नाशिक वित्त विभागाचे आयुक्त कपिल पवार, सहाय्यक नियोजन अधिकारी राहुल इधे, एरंडोलचे तहसीलदार प्रदीप पाटील, अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष राऊत, भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा भैरवी वाघ-पलांडे, ह.भ.प. रविकिरण महाराज, बँक ऑफ बडोदाच्या धुळे शाखेचे व्यवस्थापक जितेंद्र पाटील, छत्रपती संभाजीनगरचे ॲड. विनय अंजनवटीकर, सारथी पुणेचे अनिल पवार, नाशिक पर्यटन विभागाचे ज्ञानेश्वर पवार, नाशिक समाजकल्याण विभागाचे जनसंपर्क अधिकारी शशिकांत पाटील, हर्षल कापडणीस, प्राचार्य भिकाजी देवरे, मुंबईतील न्हानू ॲण्ड सन्सचे संचालक विजय एन. राठोड, मृदंग इंडियाचे संचालक अनंत भोळे, नाशिक येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता विजय भदाणे, भुसावळचे नगरसेवक नितीन धांडे, अस्थितज्ज्ञ डॉ. सुमीत सुर्यवंशी, शिरपूरचे प्रकाश महाजन व रवींद्र शिंदे, जितेंद्र वाणी, उमाकांत हिरे, राजेंद्र पाटील, रवींद्र पाटील, संजय बाविस्कर, किशोर पाटील, सुवर्णदीप राजपूत व प्रमोद पवार, एरंडोलच्या तिरुपती ॲग्रोचे संचालक पारस बियाणी तर दुपारी ३ ते ६ वाजेच्या सत्रात जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, डीवायएसपी राहुल फुला, तहसीलदार रूपेशकुमार सुराणा, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, नायब तहसीलदार पी. यू. पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश जगताप,निवृत्त पोलीस निरीक्षक विकास देवरे, सेवानिवृत्त गटविकास अधिकारी तथा वसंतराव नाईक ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष सुभाष देशमुख-जाधव, अभिषेक पाटील, जळगावच्या आयएनआयएफडीच्या संचालिका संगीता पाटील, जळगावचे ॲड. दिलीप मंडोरा, ॲड. जी. एम. पाटील, शिवसेना धुळे (शिंदे गट) जिल्हाप्रमुख सतीश महाले, मुंबईचे अनिकेत कुलकर्णी, तलाठी शितल पाटील, जळगावचे प्रमोद शर्मा, छत्रपती संभाजीनगरचे उद्योजक शैलेश कासलीवाल, महेंद्रकुमार गायकवाड, प्रदीप डोईफोडे, नाशिक येथील राजेंद्र देवरे, नासिक येथील उद्योजक वेदांशू पाटील, चोपडा येथील नितीन पाटील, नाशिकचे किरण पाटील, धुळे येथील शशिकांत सुर्यवंशी, ॲड. सोमेश्वर पवार, गिरीश पाटील, रामकृष्ण खैरनार, मनोज घोडके, अमळनेरचे विनोद अग्रवाल, राजेंद्र शिंदे, एम. जी. पाटील, जी. एस. चौधरी, निर्मल शर्मा, यश वर्मा, कुशल गुलेच्छा आणि सुभाष पवार आदी नवकुंडी महाविशेष शांतीयागाचे मानकरी होते. सायकांळी शांतीयागाची पुर्णाहूती होऊन महाआरतीने सांगता झाली. मंदिराचे पुरोहित केशव पुराणिक, जयेंद्र वैद्य, प्रसाद भंडारी, तुषार दिक्षित, मंदार कुलकर्णी, अक्षय जोशी, वैभव लोकाक्षी, गणेश जोशी, अथर्व कुलकर्णी, सारंग पाठक यांनी पौरोहित्य केले.
दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे आणि सांगवी- शिरपूरचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी श्री मंगळग्रह देवाचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, जयश्री साबे आदींनी सर्व मान्यवरांचा सत्कार केला.