जळगांव :- जिल्ह्यातील पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से हायस्कूल पाचोरा येथे दि. 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण समारंभ उत्साहात संपन्न झाला.
शाळेचे शालेय समिती चेअरमन मा. दादासाहेब श्री. खलील देशमुख यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून तांत्रिक विभागाचे चेअरमन मा. अण्णासो. श्री.वासुदेव महाजन, माजी मुख्याध्यापक मा. श्री. एस. एच. पवार सर, मा.श्री. सुधीर पाटील सर,माजी पर्यवेक्षक मा.श्री. एस. एस. चौधरी सर मा. श्री.ए.जे. महाजन सर शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री.एन.आर.ठाकरे सर, मा.श्री.एस.एन.पाटील सर हे उपस्थित होते.
. ध्वजारोहण समारंभा नंतर चित्रकला स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
संगीत शिक्षक श्री. सागर थोरात सर व श्री. रुपेश पाटील सर यांनी शाळेतील विविध विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, राज्य गीत व विविध देशभक्तीपर गीतांचे गायन केले.
शासन आदेशानुसार 'तंबाखू मुक्त शाळेची' तसेच 'राष्ट्रीय ऐक्याची' शपथ श्री.एम.आर पाटील सर यांनी सर्व उपस्थित मान्यवर,शिक्षक बंधू भगिनी पालक व विद्यार्थ्यांना दिली.
.
. क्रीडा प्रमुख श्री.एस.पी. करंदे सर व सर्व क्रीडा शिक्षकांच्या टीमने विद्यार्थ्यांकडून विविध कवायती करून घेतल्या.
याप्रसंगी शाळेचे उपमुख्याध्यापक श्री.आर.एल. पाटील सर, पर्यवेक्षिका सौ.ए. आर.गोहिल मॅडम, श्री.आर.बी. तडवी सर, श्री.आर.बी.बांठीया सर, किमान कौशल्य विभाग प्रमुख श्री. मनीष बाविस्कर सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. एम.टी.कौंडिण्य सर, कार्यालयीन प्रमुख श्री.अजय सिनकर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. आर.बी. बोरसे सर यांनी केले.