रिपोर्टर नूरखान
अमळनेर – शहरातील हॉटेल गुरुच्या शेजारी असलेल्या श्रीराम बॅग दुकानाला रात्रीच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत दुकानातील लाखो रुपयांचे बॅग व इतर साहित्य जळून खाक झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास घडली. अचानक शॉर्टसर्किट झाल्याने संपूर्ण दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आग इतकी भीषण होती की काही क्षणांतच संपूर्ण दुकान जळून गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
घटनेची माहिती मिळताच नगर परिषदेचे अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यांच्या वेळेवर हस्तक्षेपामुळे आगीचा प्रसार इतर दुकानांपर्यंत झाला नाही.
या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र श्रीराम बॅग दुकानाचे संपूर्ण साहित्य जळून खाक झाले असून लाखोंच्या नुकसानीची शक्यता वर्तवण्यात येत आहे.