Tuesday, July 29, 2025
Tuesday, July 29, 2025
Tuesday, July 29, 2025
spot_img
spot_img
A venture of Pen First Media and Entertainment Pvt. Ltd
Member of Working Journalist Media Council Registered by - Ministry of Information and and Broadcasting, Govt. Of India. New Delhi
HomeBusinessशिवसेनेचा दणका : आमदार सिद्धार्थ खरात यांच्या पाठपुराव्याला यश, भोसा येथील शेतकऱ्यांच्या...

शिवसेनेचा दणका : आमदार सिद्धार्थ खरात यांच्या पाठपुराव्याला यश, भोसा येथील शेतकऱ्यांच्या घरी सोलर कनेक्शनचे साहित्य पोहोचले.

मेहकर :- शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लढणाऱ्या शिवसेनेच्या संघर्षाला मोठे यश मिळाले आहे. आमदार सिद्धार्थ खरात यांच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे आणि प्रभावी पाठपुराव्यामुळे भोसा येथील तिघा लाभार्थी शेतकऱ्यांच्या घरी अखेर सोलर कनेक्शनचे साहित्य पोहोचले आहे. यामुळे गेल्या आठ महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची झळक दिसून आली.

भोसा येथील शेतकरी विष्णू जयराम चंदनसे, यामिनी विष्णू चंदनसे व सहदेव भिकाजी बहादुरे यांनी सोलर कनेक्शनसाठी आठ महिन्यांपूर्वी शुल्क भरले होते. मात्र दीर्घ प्रतीक्षेनंतरही कनेक्शन मिळाले नव्हते. या अन्यायाविरोधात ११ जुलै रोजी विष्णू चंदनसे यांनी वीज कंपनीच्या टॉवरवर चढून तीव्र आंदोलन छेडले होते. त्यानंतर त्यांना लेखी आश्वासन देण्यात आले होते की २० जुलैपर्यंत कनेक्शन मिळेल. मात्र आश्वासनाला हरताळ फासला गेला.

२२ जुलै रोजी पुन्हा एकदा विष्णू चंदनसे यांनी जुन्या तहसील कार्यालयाच्या टॉवरवर चढून तीव्र आंदोलन पुकारले. आंदोलनाची तीव्रता पाहून शिवसेनेचे(उद्धव बाळासाहेब ठाकरे)आमदार सिद्धार्थ खरात स्वतः घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वीज कंपनी व सोलर कंपनीच्या अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधत, कठोर शब्दांत सुनावले आणि ४-५ दिवसांत साहित्य व कनेक्शन मिळवून देण्याचे लेखी आश्वासन घेतले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

या घटनेनंतर केवळ दोनच दिवसात — आज, २४ जुलै रोजी — सोलर कनेक्शनचे साहित्य प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या घरी पोहोचले आहे. भोसा येथील माजी सरपंच व पत्रकार दत्ता उमाळे यांनी ही माहिती दिली असून, वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता विरेंद्र कळसकर यांनीही लवकरच काम सुरू होईल, असे सांगितले.

या प्रकरणामुळे शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)व आमदार सिद्धार्थ खरात यांचा शेतकरीहितासाठीचा संघर्ष व सचोटी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)सदैव सज्ज असल्याचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular