जळगांव :- नांदेडचा जिल्ह्याचा २:० ने पराभव करीत जळगावची विजयी सलामी
राज्यस्तरीय आंतर जिल्हा महिला खुल्या गटातील फुटबॉल स्पर्धेचे आयोजन पालघर येथे करण्यात आले असून त्यासाठी जळगाव जिल्ह्याचा संघ अर्शिया तडवी यांच्या नेतृत्वात प्रतिनिधित्व करत असून सोमवारी पहिला सामना नांदेड जिल्हा विरुद्ध झाला असता त्यात कर्णधार अर्शिया तडवी व चैताली सोनवणे यांनी प्रत्येकी एक गोल करून जळगावला विजयी करून दिले.
सदर संघाला जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे आश्रयदाते अशोक जैन,अध्यक्ष डॉ उल्हास पाटील, सचिव फारूक शेख, उपाध्यक्ष जफर शेख व इम्तियाज शेख, कार्याध्यक्ष प्राध्यापिका डॉक्टर अनिता कोल्हे यांनी दूरध्वनी द्वारे संघाचे अभिनंदन केले आहे.
पालघर येथे संघाचे प्रशिक्षक म्हणून तिवारी तर व्यवस्थापक म्हणून हिमाली बोरोले हे कार्य पाहत आहे.निवड झालेला जळगाव जिल्हा फुटबॉल संघ