भरत कोळी यावल(प्रतिनीधी )कार्य कारी संपादक शब्बीर खान
यावल येथे .जे .टी महाजन इंग्लिश स्कुलमध्ये . दीप अमा वस्या सन साजरा ‘यावल (प्रतिनीधी )भरत कोळी .यावल येथील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे.टी .महाजन इंग्लिश स्कूल यावल येथे दीप अमावस्या हा सण साजरा करण्यात आला.
या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या श्रीमती रंजना महाजन मॅडम उपस्थित होत्या. तसेच या कार्यक्रमाला इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या दिपाली धांडे मॅडम यांनी सुद्धा उपस्थिती दिली. अध्यक्षाच्या हस्ते गणपती पूजन व दीप पूजन करण्यात आले. त्यानंतर दिव्यांपासून बनवलेले श्री चे चिन्ह सर्व शिक्षकांनी प्रज्वलित केले. व सुंदर असा नयनरम्य प्रकाश सर्व शाळेत पसरला . तसेच शाळेच्या शिक्षिका वैशाली अडकमोल मॅडम व माधुरी पाटील मॅडम यांनी दीप अमावस्ये बद्दल मुलांना माहिती सांगितली .
तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ रंजना महाजन मॅडम यांनी सुद्धा मुलांना दीप अमावस्येबद्दल माहिती सांगितली व दीप अमावस्येच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा पाटील मॅडम यांनी केले व आभार प्रदर्शन सुजाता पाटील मॅडम यांनी केले. या कार्यक्रमाला पर्यवेक्षिका राजश्री लोखंडे मॅडम व गौरी भिरुड मॅडम यांनी उपस्थिती दिली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले व सोहळा आनंददायी वातावरणात संपन्न झाला.