भर दिवसा मोटरसायकल चोरी करणारा चोरटा अमळनेर पोलिसांच्या ताब्यात.
अमळनेर :- शहरातील राजेंद्र रतनलाल वर्मा राहणार प्रताप मिल्क कंपाऊंड अंमळनेर हे दुपारी जेवणासाठी घरी आले असता त्यांनी त्यांची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस कंपनीची मोटरसायकल क्रमांक MH 19 AF 4255 ही हॅण्डल लॉक करून त्यांचे घरासमोर लावली असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली होती त्यावरून अंमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय निकम साहेब यांनी अमळनेर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोधपथकातील पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर यांच्या नेतृत्वात पोलीस कॉन्स्टेबल अशोक साळुंखे, मिलिंद सोनार, विनोद भोई, पोलीस कॉन्स्टेबल निलेश मोरे, विनोद संनदानशिव, उदय बोरसे अशांना सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटरसायकल व अज्ञात चोरटा शोधण्याचे आदेश व सूचना दिल्या.
पथकातील पोलीस अधिकारी व पोलिस अंमलदार यांनी अमळनेर शहरातील प्रताप मिल कंपाऊंड परिसर व इतर ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पाहिले तसेच गुप्त बातमीदार यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून विजय भाईदास भील वय 19 वर्षे राहणार एकरुखी तालुका अमळनेर याने सदर मोटरसायकल चोरी केल्याचे निष्पन्न झाल्यावर त्याला एकरूखी तालुका अमळनेर येथून त्याच्या घरून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. वर नमूद आरोपी याची पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली. रिमांड मध्ये असताना त्याला सदर चोरीस गेलेल्या मोटरसायकल बाबत विचारपूस केली असता त्याने सदर मोटरसायकल ही चोरी करून डुबकी मारुती मंदिर परिसरातील झाडाझुडपांमध्ये लपवल्याची कबुली दिली.त्यानंतर सदर मोटरसायकल लपवलेल्या ठिकाणावरून हस्तगत करून जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अशोक साळुंखे करीत आहेत.
सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेतकर मॅडम, उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक कोते होते साहेब यांच्या मार्गदर्शनात व पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय निकम साहेब यांच्या आदेश व सूचनेनुसार करण्यात आलेली आहे.
पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी केले आव्हान.
शहरात व परिसरातून आपली मोटरसायकल व इतर मालमत्ता चोरी जाऊ नये ती सुरक्षित राहावी यासाठी नागरिकांनी सतर्क व सजग राहण्याची सूचना पोलीस निरीक्षक निकम साहेबांनी दिली असून नागरिकांनी सतर्कतेची उपायोजना म्हणून आपले घर, ऑफिस, गोडाऊन व इतर महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आव्हान केले आहे.