अमळनेर, ता. ३० ऑगस्ट – काल अमळनेर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही भागांत ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. नाले आणि गटारे तुडुंब भरल्यामुळे रस्त्यांवर पाणी साचले असून काही घरांमध्येही पाणी शिरले आहे.

तालुक्यातील वासरे, कलाली, टाकरखेडा, हिंगणे, मांडळ, जवखेडा या गावांमध्ये पावसाने थैमान घातले. विशेषतः टाकरखेडा शिवारात मका, कपाशी तसेच डाळ वर्गातील पिकांचे हजारो हेक्टरवर अतोनात नुकसान झाले आहे.
या संकटामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी केली आहे.