रिपोर्टर नूरखान
अमळनेर शहरात मिलादुन्नबी निमित्त अनुशासित मिरवणुकीचे आवाहन.
अमळनेर :- अमळनेर शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि व सल्लम यांच्या पवित्र जयंती अर्थात मिलादुन्नबी उत्सवाच्या निमित्ताने मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त शहरातील सर्व मुस्लिम बांधवांना ही मिरवणूक शिस्तबद्ध, शांततापूर्ण आणि धर्माच्या आदरपूर्ण भावनेने पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मिरवणूक दरम्यान फक्त तीन व्यक्तींच्या रांगेत चालण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच दरूद-ए-पाक, इस्लामी सलाम आणि हजरत सल्लल्लाहु अलैहि व सल्लम यांच्या शानला साजेशा घोषणांचा समावेश असावा, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. मिरवणुकीत कोणत्याही प्रकारची गोंगाट, अशोभनीय घोषणाबाजी किंवा वाहतूक अडथळा होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ईदगाह मुस्लिम कब्रस्तान ट्रस्ट आणि शहरातील मुस्लिम समाज प्रतिनिधींच्या वतीने, दिनांक ८ सप्टेंबर २०२५ (गुरुवार) रोजी मिलादुन्नबीच्या दिवशी ईदगाह मैदानात विशेष नमाजे मिलाद आयोजित करण्यात आली आहे.
नमाजेसाठी असरची अजान सायंकाळी ५:०० वाजता, तर जमात सायं. ५:२० वाजता होणार आहे. सर्व मुस्लिम बांधवांनी नमाजेस वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शहरातील विविध भागांतील पदाधिकारी, समाजसेवक व कार्यकर्त्यांना यामध्ये सहकार्य करण्याचे आवाहन असून, कार्यक्रम शांततेत व सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडावा यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.